07/08/2023
#काका_तुम्ही_खरंच_चुकलात...
मागील आठवड्यात देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो रेल्वेच्या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis सोबतच Ajit Pawar हे देखील उपस्थित होते. सध्या या मेट्रो महिला मेट्रो पायलट चालवत आहे. निश्चितच ही बाब भूषणाव आणि कौतुकास्पद आहे.
पहिल्याच दिवशी या मार्गावरील मेट्रोला पुण्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद देत यातून प्रवास केला. त्यानंतर दिवसेंदिवस या मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणेकाऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून मेट्रो प्रशासनाला चांगला पैसा मिळत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी साधारणतः 55 ते 60 वय असलेले एक काका धावत धावत स्थानकावर आले. आधीच मेट्रो स्थानकावरून सुटण्याची वेळ झाली असल्याने स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. अशातच मेट्रोचे चालक समोरच असल्याने या काकांनी चालकाला हात दाखवत, काहीतरी बोलून #मेट्रो थांबवून आपणास त्या मेट्रोतून प्रवास करण्याची विनंती केली असावी.
याच एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला... #पुणे_तिथे_काय_उणे म्हणून आतापर्यंत सगळ्यांनीच याची मजा घेतली आहे. यात सोशल मीडिया, मुद्रित माध्यमांपासून ते मग डिजिटल असूद्या की कोणतं प्रतिष्ठित चॅनल असूद्या...सगळ्यांनीच आपला टीआरपी मारला असेल. असो, तो विषयच नाही आज. ज्यांच्या काळात मोबाईल नव्हता, कॉम्पुटर नव्हता, दळणवळणाची हवी तेवढी साधनं नव्हती, काही भौतिक सोयीसुविधा नव्हत्या मात्र तरीही या काळात जागोजागी माणुसकीचं दर्शन घडायचं...लोकांच्या मनात प्रेम, आपुलकी, स्नेह आणि मोठ्यांबद्दल आदर असायचा...मात्र आज तुमच्यातील माणुसकीने तुम्ही जिवंतपणीच मेलेले आहात हे सिद्ध करून दाखवले आहे. काकांनी हात दाखवून मेट्रो थांबवली म्हणून टिंगल टवाळी करणारे तुम्ही परदेशात असाच काहीसा प्रसंग घडला असता तर त्या चालकाचे डोक्यावर घेऊन कौतुक केले असते. माध्यामांमधील लोकं तर पार त्याच्या घरापर्यंत किती छान माणुसकीचं दर्शन घडवलं म्हणून कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमने उधळत बेभान सुटले असते. मात्र हीच बाब जेव्हा आपल्या देशात घडते तेव्हा मात्र याची थट्टा होते. ही माणूस म्हणून आपली नैसर्गिक विचारांची खुंटलेली वाढ आहे.
ते काका कोण आहे आहेत मला याबद्दल काही एक माहित नाही...मात्र ज्या देशात गरिबांना अजूनही नीट प्राथमिक गरजा असलेल्या सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्य, आणि पर्याय उपलब्ध नाही तिथे तुम्ही त्यांच्याकडून मॉडर्न होण्याच्या अपेक्षा कशा करू करता...चला असं समजू की चुकलेच ते काका... मात्र तुम्हाला त्यांच्या काळातील काय माहित आहे याचा कधी विचार केलाय का...सिमेंटच्या जंगलात वावरणारे तुमचे मनही दगड होत असताना एक दिवस शेतकऱ्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन बैलगाडीत बसल्याचे होतो टाकता... तेव्हा कासरा, वेसण, जू, साटा हे तुम्हाला तरी माहित असते का?...तेव्हा हात दाखवून, चौकशी करूनच बसता ना...तेव्हा या दोन प्रसंगातील हीच एक समांतर विचार करण्यासारखी बाब आहे...एरवी जपानच्या मेट्रोचे आणि तिच्या स्पीडचे कौतुक करणारे भारतीय म्हणून आपल्याच माणसांना अशी वेगळ्या ग्रहावरून आल्यासारखी सापत्न वागणूक देऊ नका. तुमच्यातील माणुसकी जिवंत ठेवा, मनातला ओलावा कायम असुद्यात तरच येणाऱ्या भावी पिढ्या घडत राहतील आणि तुम्ही आज दिलेल्या संस्कारातून माणुसकीचे दर्शन घडत राहील...अन्यथा आज मेट्रो आली, उद्या आणखी काही नवीन येईलच की जे तुमच्यासाठीही एक तंत्रज्ञान म्हणून हाताळण्यासाठी आव्हान असणार आहे. तुम्हालाही बदलत्या काळाला उत्तर द्यायचेच आहे.
माणूस आहात, माणूस म्हणून जगा आणि माणुसकी जगवत राहा❤️ बाकी ज्याने हात दाखवल्यानंतर ही मेट्रो थांबवून या काकांना येऊ दिले त्याचे कौतुकच आहे.
#पुणे #पुणेकर #पुणेशहर #मेट्रो #पुणेमेट्रो
अमोल डोईफोडे
7350787793
[email protected]