Dipak Pawar

Dipak Pawar Inspired by art,
Translating it into own words,
sharing it with the world. Traveler - Writer - Speaker - Activist

संघर्ष आणि संयमाचा इतिहास अंबादास..!!गावातून शिकायला म्हणून या शहरात आलो तसतसं  #राजकारण,  #समाजकारण आणि इतर सामाजिक गोष...
14/04/2024

संघर्ष आणि संयमाचा इतिहास अंबादास..!!

गावातून शिकायला म्हणून या शहरात आलो तसतसं #राजकारण, #समाजकारण आणि इतर सामाजिक गोष्टींचा आलेख आयुष्यामध्ये सुरू झाला. मी महाविद्यालयात अकरावी-बारावीला असेल त्यावेळी पहिल्यांदा #अंबादास_दानवे Ambadas Danve - अंबादास दानवे हे नाव मी ऐकलं. जिल्ह्यातल्या तरुणांपैकी अत्यंत महत्त्वाचं नाव त्यावेळी ते मानलं गेलं. पुढे ते नगरसेवक झाले सभागृहाचे नेते झाले मजल दर मजल करत करत ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. माझा आणि त्यांच्या संपर्काला किमान पंचवीस एक वर्ष झाली असतील. कमालीचा संयम या माणसाच्या आंगी आहे हे नेहमी वाटायचं. अधून मधून एखाद दिवशी जिल्ह्याच्या राजकीय आकलनाचा विचार केला तर या माणसाची गाडी काही पुढे सरकेना असं उगाचच वाटून जायचं. पण एव्हडं असून सुद्धा या माणसाच्या कामाच्या पद्धतीमध्ये आणि मेहनती मध्ये कुठलीही कमतरता कधीच जाणवली नाही. प्रसंगी संघटनात्मक वेगवेगळे अपमान आणि अवहेलना या माणसाने अगदी संयमाने पचवलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या.

पुढे २०१७ साली मी जाणीवपूर्वक रेडिओ ची नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यवसाय आणि समाजकारण करायचं ठरवलं होतं. माणसांमध्ये जाऊन काम करणं इतकं सोपं नसतं. तुम्हाला अक्कल असली तरी राजकारणाची शक्कल अजिबात जमणार नाही असं एक दबाव वजा आव्हानच जणू लोक मला त्यावेळी देत होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या #संभाजीनगर शहरांमध्ये आपण नेता म्हणायचं तरी कोणाला आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला आपला असावा असा पक्ष तरी कोणता हा विचार मनात येतच होता. तोवर दादा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता झालेले होते.

एक मोठा भाऊ आणि मार्गदर्शक म्हणून मी दादांची भेट घेऊन दादांना मनातल्या भावना बोलून दाखवल्या. मी पुढे कसं काम करावं आणि काय काम करावं याबद्दलच्या काही कल्पना दादांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. ऐकून खूप समाधान वाटलं की राज्याच्या विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता असलेला हा माणूस, आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बद्दल इतका बारकाईने विचार करून अगदी लहान भावासारखा आपल्याला जीव लावू शकतो. याची प्रचिती मला आली. आणि त्या दिवशी मी मनोमन ठरवलं आपला पक्ष #शिवसेना आणि आपला #नेता श्रीमान अंबादास दानवे.

अजूनही मला लोक विचारतात,आता पुढे तुम्ही राजकारणात काय करणार तेव्हा मी मनातल्या मनात हसतो आणि दादांचा चेहरा आठवतो पंचवीस वर्ष एखाद्या संघटनेसाठी अगदी प्राणपणाने लढून एकेक पायरी संयमाने चढत आपल्या उत्साहामध्ये कुठेही कमतरता न ठेवता, आणि सतत #बारा_महिने_चोवीस_तास अलर्ट मोडवर एक सच्चा #शिवसैनिक म्हणून जो सदैव तयार असतो असा माणूस जर माझा नेता असेल तर माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला चिंता करण्याची ती काय गरज.

आज दादांना शिवसेनेचा नेता म्हणून निवडला गेले आहे. ही गोष्ट इतरांसाठी कदाचित एका सामान्य राजकीय घटनेसारखी असेल कदाचित परंतु, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी अतिशय #आशादायी_घटना आहे असे मला वाटते. कुठलीही #राजकीय_पार्श्वभूमी नसताना आयुष्यात अनेक संकटं असताना, रोखणारे अनेक हात असताना सुद्धा, #दुर्दम्य #इच्छाशक्ती आणि अफाट #मेहनत करण्याची तयारी जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये अशक्य असे काहीच नाही. दादांना निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

अभिनंदन दादा..!!

"नेता की रौशनी में रोशन हर क़ौम का सफ़र,
उसके कदमों से ही महकता है वतन का बाग़ीचा।"

मनापासून आभार 🙏🚩
Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut

28/11/2023
14/09/2023

गरिबाला नियम
श्रीमंताला न्याय,
रोज मरा तुम्ही
कुणा त्याचे काय.

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipak Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share