Kisan Vidyalaya &Jr. College Wadadha

Kisan Vidyalaya &Jr. College Wadadha प्रा. प्रतिक रविंद्र खेवले किसान कनिष्ठ महाविद्यालय वडधा

 #किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा #किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडध...
16/08/2026

#किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा #

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आजच्या ध्वजारोहनाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष सतिश पाटील खेवले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष मारोतरावजी दुरबुळे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवनाथजी गंडाटे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दुर्वेशजी खेवले, जं. का. चे अध्यक्ष शीडाम साहेब माजी पंचायत समिती सदस्य विवेक पा. खेवले ,प्राचार्य अमोल बोबाटे सर, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक रुंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान, राष्ट्रगीत, झेंडा गीत, राज्य गीत यांचे गायन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यासाठी आली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून देशभक्तीपर नारे च्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना जागृत केली. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीतावर कवायत सादर केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि मनोगत व्यक्त केले.तसेच तंबाखू व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा सुद्धा घेतली. यावेळी कवायतीचे दिग्दर्शन खानोलकर सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.व्ही.डी. म्हशाखेत्री सर यांनी केले.तर आभार श्री.एच.यू.सुकारे सर यांनी मानले.

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोज रविवारला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.या...
10/08/2026

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोज रविवारला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अमोल बोबाटे सर तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

आयुष्यमान भारत अंतर्गत *प्राथमिक आरोग्य सेवा  प्रशिक्षण मार्गदर्शन*       आज दि. ४ ऑगस्ट २०२६ रोज मंगळवारला *किसान विद्य...
05/08/2026

आयुष्यमान भारत अंतर्गत *प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण मार्गदर्शन*
आज दि. ४ ऑगस्ट २०२६ रोज मंगळवारला *किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा* येथे *जिल्हा प्रशिक्षण संस्था गडचिरोली* आयुष्यमान भारत अंतर्गत *प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण* यांच्याद्वारे *वर्ग ९ ते १२* च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. *क्लीनिकल सायकलॉजिस्ट गडचिरोली हॉस्पिटल* येथील श्री *.अजय खैरकर सर, लीना भोयर मॅडम स्टाफ नर्स, मीनल वाळके मॅडम स्टाफ नर्स* यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक विविध विषयास अनुसरून मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनास प्राचार्य अमोल बोबाटे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, वडधा येथे दिनांक 27 जुलै 2026 रोज सोमवारला भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्...
27/07/2026

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, वडधा येथे दिनांक 27 जुलै 2026 रोज सोमवारला भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ व 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.

प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था वडधा द्वारा संचालित,किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे...
26/07/2026

प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था वडधा द्वारा संचालित,
किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 25 /07/2026 रोज शनिवारला शालेय मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री तसेच विद्यार्थीनी प्रतिनिधी निवडणूक सत्र 2026 – 2027 घेण्यात आली.
मतदान वेळ सकाळी 8 ते 10 पर्यंत यात विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा वापर करून आपला मतदान केले. यात प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा आपलं अमूल्य मत देऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
निवडणुकीचा निकाल दिनांक 28/07/2026 रोज मंगळवार ला सकाळी 8वाजता लागेल.

प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था वडधा द्वारा संचालित किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे...
22/07/2026

प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था वडधा द्वारा संचालित
किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 22 जुलै 2026 रोज बुधवारला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 30 जून 2026 रोज मंगळवारला 2026 –2027 या शैक्षणिक क्षेत्राचा पहिला...
13/07/2026

किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 30 जून 2026 रोज मंगळवारला 2026 –2027 या शैक्षणिक क्षेत्राचा पहिला दिवस या दिवशी प्राचार्य ए.एस. बोबाटे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Address

Ar Post. Wadadha Tal. Armori Dist. Gadchiroli
Armori
442605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kisan Vidyalaya &Jr. College Wadadha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share