04/07/2023
*हाउसफुल्ल शो* *25जून 2023 अभियंता भवन*
गेली कित्तेक वर्षांपासून हाउसफुल्ल शो ची परंपरा स्वराध्या एंटरटेनमेंट ने कायम ठेवली.. हि गर्दी म्हणजे कुठल्याही प्रलोभनाशिवाय आलेली खरी रसिकांची गर्दी होती..पहिल्या गाण्यापासून तर शेवटच्या गाण्यापर्यंत ज्यांनी गायकांना प्रोत्साहन दिले असे हे रसिक माय बाप नसले तर गायकची काय किंमत.. म्हणून सर्व प्रथम आपले आपले आभार..🙏..
पहिला गायक आणि शेवटचा गायक याला नेहमी भीती असते की आपलं गाणं ऐकायला कुणी राहणार की नाही.. पण 7:20 पासून ते 11:10 पर्यंत हॉल मध्ये गर्दी तशीच कायम होती.. कारण आहे आपले सगळे *गायक* कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेऊन अप्रतिम सादरीकरण केले त्यामुळे रसिक जागेवरून हललेच नाहीत म्हणून गायकांचे सुद्धा आभार... 🙏
नवोदित नवोदित म्हणत सगळ्यांनी अगदी सरयीतासारखी गाणी गायलीत, म्हणजे ज्यांची तालाची, सुरांची भीती होती ती कुणाच्याच गाण्यात दिसली नाही. म्हणून आनंद वाटला.. कारण स्वराध्या कराओके क्लब मधले सर्वच गायक सुरेल आहेत अशी सगळी कडेच चर्चा असते ते तुम्ही सगळ्यांनी खरं ठरवलं..
कार्यक्रमाच यश हे कुणा एकाच नसते त्यामुळे या कार्यक्रमासाठी सगळ्यांची मेहनत घेतली.. कुणा एकाच नावं घेण्याची गरज नाही कारण हे team work आहे, म्हणून सगळ्यांचे खूप खूप आभार...
आयोजकांचे आभार.. 🙏🙏🙏कारण आपल्याशिवाय कार्यक्रम शक्य नाही.. प्रेत्येक गोष्टीत विशेष लक्ष घालून ते गोष्ट perfect करण्याची कला आपल्यात आहे.. आणि audiance कसा आणावा लागतो आणि कसा टिकवून ठेवावा लागतो याच पूर्ण द्यान आपल्याला असल्यामुळे आपण कार्यक्रम यशस्वी करून दाखवता त्यासाठी आपले सुद्धा आभार..
*आपल्या कराओके क्लब मधून प्रत्येक गायक चांगलाच गायला पाहिजे त्यासाठी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता निशुल्क जे द्यान आपल्याला मिळते त्याचा आपण सदुपयोग कराल.. अशी आशा आहे. इथून द्यान घेऊन कित्तेक गायक आज अमरावती मध्ये आपली कला सादर करीत आहेत याचा आम्हाला आनंद वाटतो. प्रेम, जिव्हाळा, आदर या गोष्टींनी युक्त असा हा स्वराध्या परिवार असाच प्रगती करीत राहो या सदिच्छा*
*आपले स्नेहांकित*
*स्वराध्या एंटरटेनमेंट*
*स्वराध्या कराओके क्लब*
*स्वराध्या संगीत कालोपासना*
*स्वराध्या परिवार*