Amrut Mahotsav Akluj

Amrut Mahotsav Akluj स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सहभागी व्हा..!

https://youtu.be/YCmV-vflDQwज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी,सीमेवर रक्षण करणारे व शहीद जवान आणि राष्ट्रध्वज यांना मानवंद...
18/09/2022

https://youtu.be/YCmV-vflDQw

ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी,सीमेवर रक्षण करणारे व शहीद जवान आणि राष्ट्रध्वज यांना मानवंदना देण्यासाठी माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागातील १ लाख २७ हजार राष्ट्रप्रेमी मुले-मुली व अबालवृद्ध नागरिकांनी साजरा केलेला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा...अकलूज

वरील भव्यदिव्य कार्यक्रमाची युट्यूब व्हिडीओ लिंक आपल्या मित्र,नातेवाईक व आप्तजन यांना आपल्या 💬व्हाट्सअप ग्रुप,फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर इत्यादीसारख्या 📲सोशल मिडीयाच्या माध्यमातून 🤝शेअर करा व हा व्हिडीओ 👍लाईक करा.

🔅आयोजक🔅
भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समिती,अकलूज

भाग - १ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी,सीमेवर रक्षण करणारे व शहीद जवान आणि राष्ट्रध्वज यांना मानवंदना देण्यासाठ....

https://youtu.be/XOSR4iOMs2c*मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा, आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!*...
14/08/2022

https://youtu.be/XOSR4iOMs2c

*मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा, आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!*

*तरूणाईच्या श्‍वासात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्‍यासाठी,स्वातंत्र्य सैनिक,वीर जवान,धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसह तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यासाठी रविवार दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ. ९ वाजता सदुभाऊ चौक,अकलूज येथे भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमात सर्व वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थीनी,पुरुष-महिला राष्ट्रप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.*

*या कार्यक्रमाच्या स्थळी समक्ष उपस्थित राहू न शकणारे बालक,वयोवृद्ध,परगावी असलेले नातेवाईक, राष्ट्रप्रेमी नागरिक यांचेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण (लाईव्ह) वरील व्हिडीओ लिंकव्दारे युट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.*

*युट्यूब चॅनल लिंक : 👉*
https://www.youtube.com/c/ShikshanPrasarakMandalAkluj

*तरी आपण या भव्य कार्यक्रमाचे या युट्यूब चॅनेलवर होणारे थेट प्रसारण पाहण्यासाठी सर्वप्रथम या युट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करून सदर युट्यूब चॅनेल 🖱सबस्क्राईब (SUBSCRIB) करा व या चॅनेलवर होणाऱ्या थेट प्रसारणाची आपल्या मोबाईलवर अगोदरच सूचना (नोटीफिकेशन) मिळविण्यासाठी लगेचच सबस्क्राईब (SUBSCRIB) समोरील बेल 🔔 (Bell) या चिन्हावर क्लिक करा.*

*तसेच,आपण या युट्यूब 📽चॅनेलवरील थेट प्रसारणाचा व्हिडीओ 👍लाईक करा.आपल्या मित्र,नातेवाईक यांचेसाठी आपल्या 💬व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर इत्यादीसारख्या 📲सोशल मिडीयाच्या माध्यमातून या वरील व्हिडीओ लिंक व युट्यूब चॅनेलची लिंक 🤝शेअर करा.*

*🔅आयोजक🔅*

*अध्यक्ष*
*मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील*

*कार्याध्यक्ष*
*मा.श्री.धैर्यशील मोहिते-पाटील*

*कार्याध्यक्ष*
*मा.श्री.संग्रामसिंह मोहिते-पाटील*

*💠भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव समिती,अकलूज*

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा,प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा,आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!भारतीय स्वातंत्र्याचाअमृत महोत्...
13/08/2022

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा,
प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा,
आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!

भारतीय स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवी सोहळा 2022
अकलूज

तरूणाईच्या श्‍वासात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्‍यासाठी व
तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यासाठी
शनिवार दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ७.४५ वा.
‍तिरंगा सायकल व मोटारसायकल रॅलीचे
आयोजन करण्यात आले आहे.
तरी या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे..

स्थळ I सदुभाऊ चौक, अकलूज

I आयोजक I भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव समिती, अकलूज

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगाप्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा,आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!तरूणाईच्या श्‍वासात देशभक्तीचे स...
13/08/2022

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा
प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा,
आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!!

तरूणाईच्या श्‍वासात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्‍यासाठी,
स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान, धारातिर्थी पडलेल्या सैनिकांसह
तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हा !

रविवार दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ. ९ वा.
स्थळ : सदुभाऊ चौक, अकलूज

I आयोजक I
भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव समिती, अकलूज

11/08/2022

अकलूजमध्ये साजरा होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनासाठी आग्रहाचे निमंत्रण..!!

भारतीय स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस तालुक्यात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेव माळशिरस ...
10/08/2022

भारतीय स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस तालुक्यात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेव माळशिरस तालुका तिरंगामय झाला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकलूज येथे 86 कि.मी. ची तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या सुरूवातीस भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समिती अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यामधे समितीचे कार्याध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, कार्याध्‍यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, राजइंदिरा मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील, माने-पाटील, माने-देशमुख परिवारातील सदस्य, विविध संस्थाचे कर्मचारी, सभासद, कार्यकर्ते व हजारो देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
या रॅलींचे संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साही व देशभक्तीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. मोटारसायकलवर लावण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यामुळे संपूर्ण रस्ता तिरंगामय झाला होता.

तिरंगा मोटारसायकल रॅली बुधवार दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी दु.३ वा.
10/08/2022

तिरंगा मोटारसायकल रॅली
बुधवार दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी दु.३ वा.

09/08/2022

*पावसाची रिमझिम आणि तिरंगामय वातावरणात
अकलूज येथे देशप्रेमीची बाईक रॅली संपन्न!*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकलूज येथे विविध भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यातीलच एक भाग म्हणून 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष मा. जयसिंहजी मोहिते पाटील साहेब व कार्याध्यक्ष मा.धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यामधे समितीचे कार्याध्यक्ष मा.संग्रामसिंहजी मोहिते-पाटील साहेब यांच्यासह हजारो दुचाकी स्वार सहभागी झाले होते. पावसाची रिमझिम आणि त्यामध्ये तिरंगामय वातावरण यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.

दि.९ ऑगस्ट रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शंकरराव मोहिते महाविद्यालय ,महाविद्यालयाचे गाळेधारक,औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय,शंकरराव मोहिते-पाटील इंजीनियरिंग काॅलेज व शिवरत्न नाॅलेज सिटी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही रॅली शंकरराव मोहिते महाविद्यालया पासून सुरू होऊन प्रतापसिंह चौक ,आंबेडकर चौक,जुने बसस्थानक, गांधी चौक,सदुभाऊ चौक,महर्षी चौक प्रतापसिंह चौक मार्गे पुन्हा शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे समाप्त झाली. या रॅलीत अनेक मान्यवर सहभागी झालेले दिसत होते. या तिरंगा रॅली मुळे प्रत्येकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृती झाली. यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.

Address

Shikshan Prasarak Mandal
Akluj
413101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrut Mahotsav Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share