Roks

Roks Roks Entertainment....

Sandan Valley........ , Maharashtraअद्भूत सांदण दरी.......या भागाला निसर्गाने अगदी भरभरून दान दिलं आहे.          हरिश्चं...
01/06/2020

Sandan Valley........ , Maharashtra

अद्भूत सांदण दरी.......

या भागाला निसर्गाने अगदी भरभरून दान दिलं आहे.
हरिश्चंद्रगड,रतनगड,आजोबा पर्वत,आलंग,मदन,कुलंग,कळसूबाई शिखर असे एकापेक्षा एक सरस असलेले डोंगर आणि भंडारदरा जलाशयाच्या सानिध्यात सांदन दरीच्या भिंती ऊभ्या आहेत.किल्ले रतनगडाच्या पायथ्याशी असलेलं अद्भुत शिल्पकलेनं नटलेलं अमृतेश्वर मंदिर,रांधा फाॅल्स अशा अनेक ठिकाणांनी हा भाग समृद्ध आहे.

एकमेकांना समांतर वाटणा-या सांदन दरीच्या भिंती युगानुयुगे निसर्गाचे बदलते ऋतुचक्र अनुभवत आहेत.वैशाखातलं दाहक ऊन असो की मृगातल्या बरसणा-या सरी,प्रत्येक ऋतुतं सांदन दरीचा शृंगार काही आगळाचं असतो.कशी तयार झाली असेल ही दरी?आकलनापलिकडचा थक्क करुन सोडणारा हा प्रश्न येथे आलेल्या सगळ्यांनाच पडतो.

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे.

सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाचं पाणी याच दरीतुन खाली कोसळतं.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असू शकते.
दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

दरीत गेल्यावर दोन ठिकाणी पाण्याची छोटी तळी लागतात.सध्या पाणी कमी असल्याने भिंतीचा आधार घेऊन पाय न भिजवता आपण पहिले तळे पार करतो.अजून थोडेसे अंतर चालून गेल्यावर दुसरे तळे लागते.त्या तळ्यात तीन फूटापर्यंत पाणी होते.त्यामुळे पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय रहात नाही.
काही ठिकाणी ही दरी इतकी निमुळती आहे की सूर्याची किरणंही आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

अत्यंत सावधपणे आम्ही दरीच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो.सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो.येथुन खाली उतरायला तीन मोठे रॉक पॅचेस पार करुन खाली उतरावं लागत.ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे.
या नळीच्या वाटेने खाली उतरुन तुम्ही कोकणात उतरु शकता.ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते.तेथून आसनगावला जाता येते.नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येत.अट्टल ट्रेकर्स सांदण दरी - करोली घाट असा ट्रेक करतात.

27/05/2020

This is how they do

27/05/2020

Challenge...

Cuteness overload...
27/05/2020

Cuteness overload...

27/05/2020

मराठी पाऊल पडते पुढे

27/05/2020

Adrenaline....

27/05/2020

Roadshow....

27/05/2020

This boy will never forget

27/05/2020

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.......

27/05/2020

Wildness.....

Address

Ahmednagar

Telephone

+919552911075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Roks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share