05/08/2026
नमस्कार रसिकहो,
‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक’ तर्फे प्रकाशित होणाऱ्या *पालवी २०२६* ह्या यंदाच्या दिवाळी अंकाची तयारी सुरू झाली आहे.
दिवाळी अंकासाठी खालील प्रकारचे साहित्य तुम्ही देऊ शकता.
- आपल्या मनातील गोष्टी, अनुभव, विचार, अनोखे उपक्रम, प्रवासवर्णन, छंद, कथा, कविता, आहार, पाककृती आणि आरोग्य विषयक लेख
- फोटोग्राफी: तुमच्या लेन्स मधून अनुभवलेलं जर्मनी आणि त्यामागची गोष्ट
- तुमच्या भारतातल्या सुट्टीमधे भेट दिलेले गड, किल्ले
- जर्मन भाषेबद्दल तुम्ही अनुभवलेल्या गमतीजमती
- तुमच्या लहान मुलांच्या गमतीजमती, किस्से
- मुलांनी काढलेली चित्रे, बालसाहित्य (इंग्लिश, जर्मन अथवा मराठी)
- आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या ओढीने जर्मनीत येणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींचे अनुभव, दोन्ही ठिकाणच्या संस्कृतीतील त्यांना भावलेले फरक व्यक्त करणारे लेख, कविता, कथा
- भारतातून येथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुभव
- एखाद्या वेगळ्या क्षेत्रात करियर करणाऱ्या मुलांचे अनुभव
- शब्दकोडी
अशा वैविध्यपूर्ण साहित्याची आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहोत.
*शब्दमर्यादा*
लघुकथा (२०००) शब्द
अन्य लेखन(१०००) शब्द
चला तर मग लागा तयारीला आणि लवकरात लवकर तुमचं साहित्य महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या Template चा वापर करून अपलोड करा.
Template खालील लिंक वरून घेऊ शकता:
https://mmmunich.com/diwalianka-article-upload
त्याचबरोबर लेख पाठवताना लेखकांनी आपला एखादा फोटो पाठवला तर लेखकांची सगळ्यांना ओळख होईल.अर्थात फोटो देणं हे ऐच्छिक आहे.
साहित्य तुमचे स्वतःचे असावे आणि इतरत्र पूर्वप्रकाशित नसावे. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे.
आपले लेखन पाठवण्यासाठी अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२६ आहे.
याव्यतिरिक्त काही कल्पना किंवा लेखन असल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न असल्यास [email protected] या इमेलवर अवश्य संपर्क साधावा.
धन्यवाद🙏
महाराष्ट्र मंडळ म्युनिक,
साहित्य समिती