01/07/2026
बाई.. विजया मेहता !!
माझ्या आवडीच्या अनेक सिनियर कलाकारांच्या तोंडी मी विजया बाईंचा नाव ऐकल होतं. स्त्री दिग्दर्शिका.. ज्यांनी अनेक कलाकारांना घडवलं.. अनेक सुंदर कलाकृती निर्माण केल्या.
मनोमन त्यांना भेटायची खूप इच्छा होती .
झिम्मा पुस्तकातून त्यांची ओळख झाली.. त्यांना भेटले,
खूप fascinate झाले …
आपल्याला पण या गुरू म्हणून भेटायला हव्या होत्या असं वाटून गेलं.
हुशार,कर्तृत्ववान, गुरुतुल्य , मराठी रंगभूमी वर सातत्याने खूप वेगवेगळे प्रयोग केलेल्या ,अनेक कलाकार घडवलेल्या, माणूस म्हणून चौकटीतला आयुष्या न जगता मनाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य जगलेल्या, माझ्या सारख्या अनेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकलेल्या अशा व्यक्ती दुर्मीळच !
प्रत्यक्ष भेटता नाही आल याची आयुष्यभर खंत राहील.
खूप जवळच कुणीतरी गेल्या सारखं वाटतय !
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌻