Vitamin M

Vitamin M Vitamin M is your Go To channel to stay connected for Arts & Entertainment Events happening in Florida & nearby areas! Stay Tuned & Charged with Vitamin M!

We do our best to bring the community together!

'आशाताई' -दि लास्ट एम्परर 🙏🏻💮ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आश...
04/12/2026

'आशाताई' -दि लास्ट एम्परर 🙏🏻💮

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.

लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.

तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.

'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.

मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.

व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.

जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.

मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !

जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !

आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

राज ठाकरे।

*राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ॥* *सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥*Jai Shree Ram 🙏🚩
03/26/2026

*राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ॥*
*सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥*

Jai Shree Ram 🙏🚩

03/19/2026
🍱 Check this out 🍱
03/18/2026

🍱 Check this out 🍱

03/13/2026

"कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते!" हरियाणातील फरीदाबादच्या २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. युएई (UAE) मधून १६९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती.

मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, "आई, काका... कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या." पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं!

या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील सहाही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा!

एटीसीशी संपर्क तुटला अन...: उड्डाणादरम्यान काही काळ एटीसीशी (ATC) संपर्क तुटल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. मात्र, दीपिकाने डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या एका तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली.

जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. १६९ भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात 'देवदूत' बनून आली होती.

२३ वर्ष हे वय खेळण्या-बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी 'नारीशक्ती' आहे!

"स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता १६९ भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीसाठी कमेंटमध्ये ❤️ नक्की लिहा! दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा!"

देशाच्या या रणरागिणीची गोष्ट जास्तीत जास्त Share करा.

He is extremely talented but very humble at the same time. He is an oncology specialist.  His work has been cited by oth...
02/28/2026

He is extremely talented but very humble at the same time.

He is an oncology specialist. His work has been cited by other professionals, reflecting his active engagement in oncology research.

He is a medical director at a very well known cancer research center 🩺🥼

He is none other than our own *Dr. Kedar Kirtane*

Please join us tomorrow, this Saturday for a special session with him to learn more about the symptoms and care for Head and neck disorders in children range from common, often benign too.

*Vitamin M* Motivator Speaker session with *Dr. Kedar Kirtane*

Saturday, February 28·

From 3:00 – 3:40 PM

Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/72939281523?pwd=Vp6ra1o6DpbiUb9ZtDolcMd5HRevH1.1

Meeting ID: 729 3928 1523
Passcode: HhP6mi

Address

Orlando, FL

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vitamin M posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Featured

Share

Vitamin M - a story telling

नमस्कार मंडळी! 📷

सर्व क्षेम कुशल ना ? कदाचित खूप दिवसांनी ऐकला असेल न हा "क्षेम कुशल" शब्द!

असं म्हणतात की भाषा माणसं जोडते!

एकमेकांशी संवाद साधणारे, संस्कृतीची देवाण-घेवाण करणारे उत्तम मध्यम म्हणजे भाषा!