05/06/2023
घटना आहे मँचेस्टरची. काही दिवसांपूर्वीच मधुस्मिता जेना या ४१ वर्षीय भारतीय महिलेनं इंग्लंडच्या मँचेस्टर या शहरात ४२.५ किलोमीटर मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. फूल मॅरेथॉन पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नाहीच, पण तरीही कोणी म्हणेल की त्यात काय विशेष? कारण काही महिन्यांच्या सरावात तुम्ही मॅरेथॉन अंतर पूर्ण करू शकतात; पण मधुस्मिता यांचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी संबलपुरी साडी नेसून या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. नुसता भागच घेतला नाही, तर ही शर्यत पूर्णही केली, तीही अतिशय सहजपणे, हसत हसत, इतरांना प्रोत्साहन देत.