30/07/2026
२५ जुलैचा मुसळधार पाऊस, जीवघेणं ट्रॅफिक आणि समोर उभा असलेला वेळेचा अक्राळविक्राळ राक्षस!
ठाण्यातील 'डॉ. काशिनाथ घाणेकर' नाट्यगृहातील दुपारी ३:३० चा प्रयोग संपवून 'एकदा पाहावं करून' या नाटकाची टीम दादरच्या 'श्री शिवाजी मंदिर' येथील रात्री ८ च्या प्रयोगासाठी निघाली होती. पण निसर्गाच्या खेळापुढे आणि मुंबईच्या ट्रॅफिकपुढे वेळेचं गणित पार कोलमडलं. प्रेक्षक नाट्यगृहात येऊ लागले होते, पण नाटकाचा सेट घेऊन येणारी बस रात्री ८:२५ वाजता कशीबशी पोहोचली.
'एकदा पाहावं करून' या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात दोन घरांचं भव्य, देखणं आणि तितकंच वजनदार नेपथ्य (सेट) आहे. एरवी हे दोन संपूर्ण सेट उभे करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे प्रयोग वेळेत सुरू होणं अशक्यप्राय वाटत होतं.
पण म्हणतात ना, पडद्यामागचे कलाकार हेच मराठी रंगभूमीचे खरे आधारस्तंभ असतात!
या नाटकाच्या बॅकस्टेज टीमने तिथे एक चमत्कार करून दाखवला. अशक्य गोष्टीला शक्य करत, अवघ्या १२ ते १५ मिनिटांच्या विक्रमी वेळेत दोन्ही सेट स्टेजवर अचूक उभे केले! आणि रात्री ८:४५ वाजता तिसरी घंटा वाजवून प्रयोग दिमाखात सुरू झाला.
मध्यंतरात सर्व मुख्य नटांनी एकत्रित येत या पडद्यामागील खऱ्या शिलेदारांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या निष्ठेला शाबासकीची थाप दिली. मुसळधार पाऊस आणि संकटांवर मात करत केवळ नाटकाप्रती असलेल्या प्रेमामुळेच हा
प्रयोग यशस्वी होऊ शकला.
पडद्यापुढचे नट आपण रोज पाहतो, पण खऱ्या अर्थाने कौतुक आणि मानाचा मुजरा या पडद्यामागील खऱ्या हिरोंना!
Voice over Namantar Rajendra Kamble
[Ekda Pahava Karun,Natak, Marathi theatre,Marathi Natak, stage, artist, Anand Ingle, Vaibhav Mangle]