03/06/2026
TRPS Library : एक साकारलेलं स्वप्न
- स्मिता परांजपे
एक काळ असा होता की पुस्तकं हाच जगाचा आरसा होता. अगदी TV आल्यानंतरही जे दाखवलं जाईल ते आपण पहात होतो. एखाद्या व्यक्तीची, विषयाची किंवा घटनेची माहिती हवी असेल तर अनेक पुस्तकं पालथी घालावी लागत असत. ज्ञानाचे काही कण मिळवण्यासाठी अनेक तास खर्च करावे लागत. ग्रंथालयं, पाक्षिकं, संदर्भग्रंथ, आणि त्या विषयातील जाणकार व्यक्ती हेच माहितीचे प्रमुख स्रोत होते.
आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इंटरनेटच्या युगानंतर आता Artificial Intelligence च्या जादुई काळात आपण प्रवेश केला आहे. AI असिस्टंटला एखादा प्रश्न विचारला की अनेक स्रोतांमधली माहिती एकत्र करून काही सेकंदांत अगदी सुबद्ध स्वरूपात तो आपल्या समोर मांडतो, जणू एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिल्यावर तयार पदार्थ टेबलावर येतो तसं. Shorts आणि reels च्या जमान्यात ज्या माहितीची आपल्याला जरुरही नाही ती माहितीही सहजगत्या समोर येते. पण AI ला माहिती ‘माहित’ नसते, ती मानवाने अनेक शतकं लिहून ठेवलेल्या, चित्रित केलेल्या, कोरून नोंदलेल्या.. अशा अनेक प्रकारच्या ज्ञानसंपदेतून ‘शोधली’ जाते.
TRPS Library हा ज्ञानसंपदेचा असाच एक अमूल्य ठेवा आहे. ‘दृष्यकला’ या विषयाशी निगडीत असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह एखाद्या established कलासंस्थेच्या संग्रहालाही टक्कर देईल इतका समृद्ध आहे. आज ‘algorithms’ आपल्याला काय वाचावं, काय पाहावं, हेच नाही तर काय आवडावं, हे ही ठरवू लागले आहेत. अशा काळात TRPS Library सारख्या जागा अधिकच महत्त्वाच्या ठरतात. कारण तिथे अजूनही ‘ऐच्छिक’ आणि ‘अनपेक्षित’ शोध जिवंत आहे, अजूनही कुतूहलाला जागा आहे.....
Read full article here- https://www.raviparanjape.org/visual-melody