Akshar Akshar Tuzech Aahe

Akshar Akshar Tuzech Aahe स्वरचित कवितांची बहारदार मैफल
सादरकर्ते कवी:
अपूर्व राजपूत | अविनाश काठवटे
सारंग पांपटवार | नैनेश तांबे
कार्यक्रमासाठी संपर्क: 7972927440

12/10/2026

अक्षर अक्षर रसिक कधीच नाराज करत नाहीत. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे रसिक प्रेक्षकहो!

50% Tickets Sold Out | आताच आपले तिकीट बुक करा! पुण्यात पहिल्यांदा ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ | OPEN AIR SHOW!काही अक्षरं फ...
12/10/2026

50% Tickets Sold Out | आताच आपले तिकीट बुक करा!

पुण्यात पहिल्यांदा ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ | OPEN AIR SHOW!

काही अक्षरं फक्त वाचायची नसतात… ती ऐकायची असतात, अनुभवायची असतात आणि मनात जपून ठेवायची असतात. ❤️

आतापर्यंत अनेक शहरांनी ज्या कवितांना आपलंसं केलं, तोच शब्दांचा, सुरांचा आणि भावनांचा प्रवास आता पहिल्यांदाच Open Showच्या रूपात तुमच्यापुढे सादर होतो आहे!

📍 पुणे इंटरनॅशनल सेंटर, पंचवटी, पाषाण

आणि हो… यावेळी रंगमंचावरची प्रत्येक ओळ तुमच्यासाठी आहे. तुमच्यातली आहे. तुमचीच आहे.

कारण शेवटी… अक्षर अक्षर तुझेच आहे! ❤️

09/10/2026

खूप खूप धन्यवाद पनवेलकर या प्रेमासाठी!

कवितांच्या, भावनांच्या, आणि आपल्या हक्काच्या माणसांच्या सोबतीने…‘अक्षर अक्षर तुझेच आहे’लवकरच संभाजीनगरमध्ये! ✨
09/10/2026

कवितांच्या, भावनांच्या, आणि आपल्या हक्काच्या माणसांच्या सोबतीने…

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’
लवकरच संभाजीनगरमध्ये! ✨

काही कलाकार भूमिका साकारतात, काही भूमिका जगतात आणि काही कलाकार आपल्या जाणिवांचा एक भाग होऊन जातात.नाना पाटेकर हे अशाच वि...
08/10/2026

काही कलाकार भूमिका साकारतात, काही भूमिका जगतात आणि काही कलाकार आपल्या जाणिवांचा एक भाग होऊन जातात.

नाना पाटेकर हे अशाच विलक्षण कलाकारांपैकी एक!

अभिनयातली सहजता, संवादफेकीतली धार, डोळ्यांतून व्यक्त होणारी असंख्य भावनांची स्पंदनं आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला आतून समजून घेण्याची त्यांची ताकद, यामुळे नाना केवळ अभिनेते राहिले नाहीत, तर ते भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरले.

पण नानांच्या व्यक्तिमत्त्वाची एक सुंदर बाजू म्हणजे कवितेची त्यांना असलेली उत्तम जाण! शब्द केवळ ऐकायचे नसतात, तर ते जगायचे असतात, हे त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वातून जाणवत राहायचं. म्हणूनच त्यांच्या अभिनयात केवळ संवाद नव्हते, तर त्यामागची भावना, वेदना, अस्वस्थता आणि माणूसपण दिसत होतं.

एक ताकदीचा नट, एक संवेदनशील माणूस, कवितेचा जाणकार रसिक आणि असंख्य मनांवर ठसा उमटवणारा कलाकार…

पडदा पडतो… भूमिका संपते पण एखादा महान कलाकार आपल्या मनातून कधीच निघून जात नाही.

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ टीमकडून नाना पाटेकर यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

तुमचा अभिनय आठवत राहील, तुमचा आवाज ऐकू येत राहील आणि कवितेकडे पाहण्याची तुमची संवेदनशील नजर आमच्या कायम स्मरणात राहील!

पहिल्यांदाच… राजधानी साताऱ्यात! ❤️ज्या मातीत इतिहासाने स्वराज्याच्या पाऊलखुणा जपल्या, त्या राजधानी साताऱ्यात आता शब्दांच...
07/10/2026

पहिल्यांदाच… राजधानी साताऱ्यात! ❤️

ज्या मातीत इतिहासाने स्वराज्याच्या पाऊलखुणा जपल्या, त्या राजधानी साताऱ्यात आता शब्दांची, कवितांची आणि भावनांची मैफल रंगणार आहे…

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’चा साताऱ्यातील पहिलाच प्रयोग! ✨

राजधानी सातारा... आता भेटूया अक्षरांच्या सोबतीने! ❤️

07/10/2026

पनवेल मध्ये पुन्हा एकदा
अक्षर अक्षर तुझेच आहे या कार्यक्रमाला रसिकप्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद ❤️😄👏



07/10/2026

ज्या भाषेने आपल्याला व्यक्त व्हायला शिकवलं, तिच्या अभिजातपणाचा उत्सव… कवितांच्या साथीने! ❤️

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार आहे ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ची बहारदार मैफल!

📍 आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी चिंचवड
🗓️ ०९ ऑक्टोबर | शुक्रवार
⏰ दुपारी १२:३० वा.
🎟️ प्रवेश विनामूल्य

या!!! कारण कविता ऐकण्याचा आनंद कविता जगण्याइतकाच सुंदर असतो. ❤️

06/10/2026

पुन्हा एकदा आपल्या नाशिकमध्ये अक्षर अक्षर तुझेच आहे येत आहे घेऊन स्वरचित कवितांची बहारदार मैफल!

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshar Akshar Tuzech Aahe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category