Urja kshirsagar

  • Home
  • Urja kshirsagar

Urja kshirsagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Urja kshirsagar, Poet, Balgandharva Rangamandir, .

24/12/2025

*Secret Santa*✨
" Jingle Bell Jingle Bell Jingle all the way
Oh, what fun it is to ride in a one horse open sleigh "
खरंतर बर्फाळ डोंगरातून एका घोड्याच्या गाडीचा लगाम पकडणारा Santa आणि सोबत चिमुरडी असे चित्र वरील गाण्याबरोबर लगेचच डोळ्यासमोर तरळते. डिसेंबरच्या गुलाबी थंडीतील Christmas चा आनंद हा secret santa च्या जोडीनेच येतो किंबहुना वाढतो.
अगदी कालचीच गोष्ट माझ्या राहत्या घरासमोरील ख्रिश्चन कुटुंबात काल christmas 🎄 Eve celebrate झाली त्यात अगदी बोटाला हात धरून चालणाऱ्या पासून काठी धरून चालणाऱ्या प्रत्येक परिचितांचा समावेश होता . सर्वांनी (red and white) लाल पांढरा गोंडे असलेल्या टोप्या घातलेल्या आणि सर्वजण उत्साहित होऊन त्यांच्या ढोल, ड्रम वर टाळ्यांच्या साथीने भावपूर्ण स्वरात त्यांची प्रार्थनायुक्त गाणे गायली अगदी पाच ते दहा मिनिटं आणि नंतर प्रसाद युक्त चॉकलेट्स, डोनट्स, केक, पेस्ट्रीज याचा परिपूर्ण आस्वाद घेऊन दुसऱ्या घरी प्रसन्नता वाटायला गेले . हे दरवर्षी नित्यनियमाने मी आणि माझी मुलं तितक्याच आनंद आणि कुतूहलाने पाहतो त्यांच्यातील स्नेह पाहून आमचे मन तृप्त होते. संघटित होऊन आनंद ओसंडून वाहन्या इतकी अनुभूती वेगळीच असते.
खरंतर त्यांच्यातील जो secret santa असतो त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे की लाल पाय घोळ ड्रेस परिधान केलेला पांढरीशुभ्र दाढी मिशा असलेला पाठीवर पोटली आणि डोक्यावर विदूषकाची टोपी सारखी टोपी ती सुद्धा लाल आणि पांढरी घातलेला , चेहऱ्यावर इतकं गोड हास्य घेऊन आलेला असतो एवढा वर्णन करायचं कारण एकच की एरवी लाल भडक वाटणारा रंग त्यावेळेस खूप स्नेहाचा, हर्षाचा वाटतो पांढरी शुभ्र दाढी मिशा असलेला आणि पाठीवर गोणी घेतलेला वयोवृद्ध त्यावेळेस Divine Angle वाटतो त्याचं निरागस हास्य कोणत्याही परक्याला आपलं करतो आणि त्याच्या पाठीवरच्या पोटलीत साऱ्या जगाचा आनंद, सुख, समाधान, प्रेम, करुणा, दया घेऊन तो फिरतो म्हणून कितीही परका असला तरी तो आपल्याला आपल्या हृदयाजवळचा वाटतो अगदी घरातला सदस्यच.
मुळातच आनंद वाटल्याने वाढतो तो जे निस्वार्थपणे इतरांना देतो त्याची परतफेड 100 पटीने वैश्विक शक्ती त्याच्याकडे करते. जिवाभावाचा, आपल्या आयुष्यात सुख पेरणारा, न मागता ही देणारा हा secret santa हा आपल्या प्रत्येकात असतोच तो शोधायचा आपला आपणच.
आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या सभोवताली असणाऱ्यांना आपण काय देतो आणि काय देऊ शकतो याचे बारकाईने अवलोकन करूया आणि यात आता फेरबदल करण्याची वेळ आली आहे. आनंदा ची दुकानं थाटायचे ,आनंद हा आता online आणि offline,door to door nd more nd more वाटायचा "मागा तेव्हा मिळेल, आणि मागाल तेवढा मिळेल"ही संकल्पना केवळ अस्तित्वात नाही तर अमलात आणायची आहे.
संपूर्ण विश्व हे विविधरंगी हास्येच्या छ्टेने रंगवायचे, one should raise their hands to give and not to take जर समाजातील प्रत्येक जण secret santa झाला तर आनंदाचा संसर्ग, आनंदाचा परीस
स्पर्श होईल आणि विश्व आनंदाचे डोही, आनंद तरंग होऊन खऱ्या अर्थाने तो सच्चिदानंद,
चैतन्य घन भरून पावेल .
शब्दांकन- सौ ऊर्जा (सुरेखा)क्षीरसागर.

25/04/2025
01/02/2025

Move forward nd take decision





19/10/2024

~ऊर्जा क्षिरसागर




#सुख

Great भेट with Sankarshan Sir!❤️✨ Sankarshan Karhade  ाट्यप्रयोग  #तू_म्हणशील_तसंSankarshan Karhade
01/10/2024

Great भेट with Sankarshan Sir!❤️✨ Sankarshan Karhade ाट्यप्रयोग #तू_म्हणशील_तसं
Sankarshan Karhade

Address

Balgandharva Rangamandir

411004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja kshirsagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share