My Marathi Poems.

My Marathi Poems. The page contains my self written poems I reserve copyright for them. Some of them are recorded in my voice.

26/04/2026

अलीकडे सूर्याच्या
उष्णतेने
सारेच
होरपळू लागले
त्यावर उपाय म्हणून
वैज्ञानिकांनी
अंतरीक्षात कूलर
लावले
आणि
सूर्य शांत होऊ
लागला
आपल्या
कीरणांतून
शीतल लहरी
प्रक्षेपित करू
लागला
वातावरणातील
हा बदल
देतो चाहूल
येणाऱ्या नव्या
अनोख्या
सूर्योदयाची
मानवनिर्मित
निसर्गाच्या
कीमयेची!

23/03/2026

विश्व जल दिनी
देवभूमीत केलेली
नखशिखांत अंघोळ
नष्ट करते विश्वमनातील मळ
होतात सारेच निर्मळ
मनामनांचा प्रेमळ संवाद
मिटवतो सारे मिथ्या वाद
नवे काव्यशास्रविनोदाचे
पर्यावरण निर्मित
नव्या गीतसंगीताच्या
मैफीली सजवित
"मस्त बहारोंका मैं आशिक
मैं जो चाहे यार करू
चाहें गुलो के सायेसे खेलू
चाहे कली से प्यार करू
सारा जहाँ है
मेरेलीए हे मेरेलीए"
या ओळींचा अर्थ स्वतः ला स्पष्ट करत.

श्री.ग.वैद्य अग्निहोत्री
दि.२३-०३-२०२६
सकाळी ६-२६
वाजता.(स्वानंदार्थ

15/03/2026

आजवरच्या सुस्मृतींची नवी मांडणी
हीच माझी नवी कहाणी
माझ्या समग्र अनुभव विश्वाचे इतिवृत्त
माझ्यासहीत सर्वसख्यासोबत्यांचे आत्मवृत्त
सर्वांना भावणारे नवकाव्य
"पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावीकाळ"
ह्या महाराष्ट्रोक्तीचा आशय स्पष्ट करणारे
विश्वभाषा मायमराठीचे वैभव सांगणारे
ज्ञानोबा, शिवराय,रामदास अन् तुकारामांचा आध्यात्मिक वारसा जपत
टिळक,आगरकर,सावरकरांचे ऋण फेडत
फुले,शाहू, आंबेडकरांची
वाट चोखाळणारे
साने गुरुजींचा प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरविणारे
नारळीकर,माशेलकर,गोवारीकरांच्या विज्ञानदृष्टीची कास ठेवणारे
माता-पिता अन् समर्थ सद्गुरूंच्या कृपेने लाभलेले सर्वच महानुभावांकडून वेचलेले
नवे विचारधन कधीच न संपणारे!

27/02/2026

मराठी

मराठी असे माझी मायबोली
जी टिपते साऱ्या संवेदना अन् हालचाली
नवी निरीक्षणे स्वतः च्याच डोळ्यांनी पाहीलेली
सांगत सभोवतालच्या पर्यावरणाचा वृत्तांत
अथपासून आतापर्यंतचा
कालच्या अन् आजच्या क्षणांचा
जो सहजच बनतो पाया
येणाऱ्या उद्याचा
रोज नवे विश्व प्रकाशित करणाऱ्या
शितल सौरशक्तीने भारलेला
नित्यविद्यमान शिव-शक्तीचा
नवा आविष्कार
नव्या गणनायकाला
साकार करणारा
अलौकिक चमत्कार
"सर्वं खलु इदं ब्रह्म"
ह्या उपनिषदोक्तीच्या
आंतरिक अद्वैतानुभवाचा
नवा साक्षात्कार
नव्या कृष्णाच्या नव्या बाललीलांचे
नवे भागवतरुपी अमृत
नव्या व्यासांनी रचलेले
नवे महाकाव्य
नव्या भारताला साकार करणारा नवा प्रबंध
नव्या संशोधनाच्या
नव्या वाटा दाखवणारा
नवा आकृतीबंध
प्रकृतीची नवनवी रुपे
साकार करणारा मनस्वी नवकवींचा व्यवहार!
शब्दार्थांचे नवे प्रदर्शन
मराठी गौरव दिनानिमित्तचे
नवे संबोधन
स्वतःसाठीच स्वतः ला सूचलेले आत्मप्रबोधन!

Address

C-601 24K Glitterati Phase 1 Pimple Nilakh
Pune
411027

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Marathi Poems. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category