13/08/2026
#हेडाम* कादंबरीतील धनगरी स्त्रीजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या बोलक्या प्रतिक्रिया अवश्य वाचा
@ सौ.अपर्णा जगताप बलॉग राईटर
--------------------------------------------
ही नागू विरकर यांची कादंबरी अलीकडेच 6 वी आवृत्ती पेन पब्लेकेश हाऊस कडून प्रकाशित झाली आणि ती मी पूर्ण वाचून काढली..
मानदेशातील भटक्या मेंढपाळाचे प्रवासवर्णन, दुष्काळी भाग, त्यावर चित्रांकित वर्णन करून लिहिलेल्या गोष्टी...
भटकंती करणारा हा मेंढपाळ आपल्या कोकरांना जगविण्यासाठी गावोगाव फिरणारा त्याची धडपड पाहून आम्हावाचकांना भारावून सोडताना नवीन व्यथा, हुंकार नागू (नायक) यांचा संघर्षमय जीवन प्रवास आम्हा वाचकांना थक्क करून सोडतो...
धनगर वाड्यातील अनेक कुटुंबांच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य सणवार, चालीरीती, परंपरा, नृत्य, ढोल, ठोक्यावरील गाणी.. मला इथे वाचायला मिळाल्या आणि न्यातही झाल्या...
अन्न,वस्त्र,निवारा आणि त्याहून मौलाचे शिक्षण... यासाठी करावा लागणारा संघर्ष... हे वाचल्यावर ही संपूर्ण कादंबरी मला माझ्या जवळची वाटून राहिली...
लेखकाची रानटी पण आपल्याच मातीतील वाटणारी जवळचीच बोलीभाषा मला वाटली...
भटक्या जाती जमातीतील मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी त्यातून जिद्दीने तुमच्यासारखा एखादा मुलगा मुलगी संघर्षाच्या छातीवर बसून मात करणारा यशस्वी विद्यार्थी मला इथे वाचायला मिळाला...
नागू वीरकराचा मुक्या प्राण्यांवरचं प्रेम चौथीच्या वर्गात शिकत असतानाच चुलीशी आलेला भावनिक नातं स्वतः भाकरी करून खातो. हा सर्वात संघर्षमय जीवन प्रवास मला भावला. पुढेही स्वतः स्वयंपाक करून शिक्षण घेत घेत पुढे चाललेला नायक मला वाचायला मिळाला..
बारीक बारीक सूक्ष्म वर्णन वाचून मी अचंबित झाले...
*बाल वयात इतकं शहाणपण इतकं बळ कुठून तुमच्यात आलं*
देवा समान गुरु तुम्हाला लाभले विरोध पत्करून ध्येयाने तुम्हाला पुढची दिशा दर्शविली गुरु शिष्य असं प्रेम मला जास्त भावनिक तिकडे घेऊन गेलं. निसर्गातील घडामोडी, मेंढीचे फायदे, रोग, आजार.. हे आपल्या कल्पनेने अचूक बांधणे इथे मला एक 'मेंढपाळ' साक्षरतेपेक्षा कमी नाही वाटला प्रत्येक आजारावर गावठी रामबाण मिरॅकल सारखं उपचार करणे, हे कोणी पी.एच.डी पेक्षा कमी नाही. त्यांची बोलीभाषा जसेच्या तसे इथे वर्णनात्मक रूपाने मांडलेली आहे त्यात कुठलाही ठेकेखोरपणा मला वाचताना आढळला नाही..
देवापुर येथील रयत शिक्षण संस्थेत एकत्र शिकत असताना त्यांचा जीवन प्रवास मी वाचला आणि प्रत्यक्षात माझ्या मेंदू पटलावर कोरून ठेवून पाहिला ही...
मला फक्त श्रद्धा अंधश्रद्धा यात थोडं खटकलं...
संघर्ष रुपी वास्तववादी जीवनपट एका चित्रपटासारखे माझ्यासमोर या कादंबरी वाचनातून उमटत होते...
*हेडाम* ही कादंबरी वाचत असताना सतत तुमच्या मेंदू पटलावर बाबासाहेबांचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे आत्मसात करून ठेवले, याबद्दल मला फार अभिमान वाटला तुमचा...🙏
नक्कीच *"हेडम"* ही कादंबरी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोलाची देणगी ठरेल.. विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही कादंबरी प्रेरणादायी आणि वास्तवाला धरून असणार आहे...
*हेडाम* या कादंबरीच्या नायकाची आई ही माऊली साधी, भोळी, निरक्षक. 'पण' साक्षरतेचे अफाट ज्ञान जणू काही पूर्वजात घेऊन आलेला वारसाच... वेळोवेळी (नायकाला) आपल्या लेकाला पुढील शिक्षण घेण्यासाठी अहोरात्र कष्ट करून लेकासाठी उभी राहणारी ही एक आईच करू शकते.. तिची माया, ममता, काळजी मला एका आईत इथे वाचायला मिळाली..
पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल काही चुकले नाही. काहींना परिस्थिती, घरातील माणसे, समाजातील भीती, चालीरीती यात स्त्रीची घुसमट होत गेली...
*"पण"* शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांनी शिक्षणाची कवाडे आपल्यासाठी खुली करून दिली. स्त्रियांना शिक्षण घेता यावे त्यांनी निरक्षक न राहता साक्षरतेच्या वाटेने चालावे म्हणून समाजातील तळागाळातील स्त्रियांना शिक्षणासाठी या महामानव (नायक) आणि महा मानवी (नायिका) यांनी समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेऊन ते फलास प्राप्त करून नेले. म्हणून आज स्त्री स्वालंबी झाली आहे ती उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरीही करीत आहे...
अशा नायक नायिकांना माझा त्रिवार अभिवादन...🙏🌿💐🌿🙏
मात्र काही अपवाद स्त्रीचा उच्च शिक्षण घेऊन ही माहेर,सासरच्या इच्छा,आकांक्षा आपल्या शिक्षणाला गुणवत्तेला बाजूला ठेवून मूकपणे लेक, सुनेचे नाते निभावत आहे. स्त्रीला विरोध करणारे हे मुळात बाहेरचे नसतातच ते तिच्या घरातीलच असतात बाहेरच्यांना ति न जुमानता धीट पणाने सामोरे जाऊन लढूही शकते. पण जर विरोध हा घरातूनच आला तर स्त्रीला मागे खेचणारा पहिला विरोध आपल्याकडूनच येतो समाज तर नंतरचा भाग झाला..
मी इथेच थांबते...
आणि आपणास खूप खूप शुभेच्छा देते🪴💐
आपली पुढील आवृत्तीस माझ्याकडून सदिच्छा व्यक्त करते...🙏🪴🙏
*धन्यवाद,*
मानसशास्त्रीय समुपदेशक
सौ अपर्णा बेंगळे/जगताप
फोन नंबर:- *9850808341*
माझी ओळख खालील प्रमाणे...
मी एक ब्लॉग राईटर आहे, पुस्तक सखी, स्व लिखाण.. कविता लिहिणे.. सामाजिक कार्य, विनामूल्य बाल संस्कार वर्ग चालवते...
🙏🙏🌳🌳🙏🙏
पुस्तकासाठी संपर्क 9890697998