Shekhar Naik

07/02/2026

#पुणेकर #नाटक

आज चित्रकार अमृता शेर गिल चा ११३ वा जन्मदिवस.( ३० जानेवारी १९१३ )   ‘आपकी अमरी ’ नाट्यप्रयोग ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६...
29/01/2026

आज चित्रकार अमृता शेर गिल चा ११३ वा जन्मदिवस.
( ३० जानेवारी १९१३ )

‘आपकी अमरी ’ नाट्यप्रयोग ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता   ----------- अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित हिंदी नाटक

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित ‘आपकी अमरी ’ हा नाट्यप्रयोग पुणेकर रसिकांसाठी सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू सभागृह ( सेनापती बापट रस्ता ) येथे  होणार आहे.
‘आपकी अमरी ’  या नाट्यप्रयोगात अमृता शेरगिल यांनी आयुष्यातील विविध टप्प्यांवर लिहिलेल्या पत्रांचे हिंदी भाषेत नाट्यात्म सादरीकरण करण्यात येणार आहे. या पत्रांतून त्यांच्या वैयक्तिक भावना, कला-दृष्टी, सामाजिक जाणिवा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उलगडतो. या संकल्पनेला रंगमंचावर सजीव रूप देण्याचे दिग्दर्शन रंगकर्मी शेखर नाईक यांनी केले आहे. या नाट्यप्रयोगात मुग्धा भोसले आणि सानिका आपटे या कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या सशक्त अभिनयातून अमृता शेरगिल यांचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर उभे राहणार आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर केला जाणारा हा २७७ वा प्रयोग  आहे.
प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव  प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. सर्वानी अवश्य हा प्रयोग पहावा.

23/01/2026

नक्की या...
#पुणेकर #नाटक

15/01/2026

#नाटक #पुणेकर #अभिवाचन

पुणे नाट्यसत्ताक २०२६पुण्यातील सर्वोत्तम नाटकांचा महोत्सव अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचे चित्रपट प्यासा,...
13/01/2026

पुणे नाट्यसत्ताक २०२६
पुण्यातील सर्वोत्तम नाटकांचा महोत्सव

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचे चित्रपट प्यासा, कागज के फूल, साहेब बीबी और गुलाम हे आजही देशात परदेशात अभ्यासले जात आहेत. गुरुदत यांचे आयुष्य आणि त्याच्या चित्रपटाचे विषय हे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी एकमेकांशी जोडले. त्या सगळ्याचं वास्तव फक्त आणि फक्त गुरुलाच माहिती होतं. त्याच्या आयुष्यात आलेले अनेक सहकलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कामगार यांच्यासाठी गुरू कायम मित्रच होता. त्याला शेवटपर्यंत एकटेपणात कोणी साथ दिली असेल तर तो होता स्वतः गुरुदत्त.

गुरुदत्त यांनी बंगाली लेखक बिमल मित्र यांच्या ‘साहब बीबी और गुलाम’ या कादंबरीवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्यापासून बिमलदा आणि गुरुदत्त यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.
बिमल मित्र यांनी त्यांच्या आठवणी खोल चिंतनातून ‘बिछडे सभी बारी बारी’ या पुस्तकात लिहिल्या आहेत. लेखक चंद्रकांत भोंजाळ यांनी मराठीत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

‘बिछडे सभी बारी बारी’ हा दृकश्राव्य अभिवाचन प्रयोग गुरुदत्त आणि बिमल मित्र यांच्यातील नाजूक मैत्रीचा एक मार्मिक प्रवास आहे. पुस्तकात लिहिलेला हा प्रवास नाट्यमय अभिवाचनाद्वारे आणि दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने अनुभवायला नक्की या....

‘बिछडे सभी बारी बारी’

संकल्पना, संकलन, नेपथ्य, वेशभूषा आणि दिग्दर्शन : शेखर नाईक
सह दिग्दर्शन: सानिका आपटे
ध्वनी संयोजन: राघव वर्तक
प्रकाशयोजना: चित्रा दिवगी

कलाकार: दिलीप जोगळेकर, सानिका आपटे,
ऋषिकेश खांबेटे, शेखर नाईक

शुक्रवार | १६ जानेवारी २०२६ | सायं. ७ वाजता | द बॉक्स २, नळ स्टॉप मेट्रो स्टेशन जवळ,

• तिकिटांसाठी संपर्क
९५२७३६९०९१ / ७५५८३६२०३६

• ऑनलाइन तिकिटे https://ticketkhidakee.com/explore/all/Pune%20Natyasattak/bichade-sabhi-bari-bari-pune-natyasattak/6944e88def446176d7fc9006

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shekhar Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shekhar Naik:

Shortcuts

Share