07/09/2026
❤️ शब्द अपुरे आहेत… मन मात्र कृतज्ञतेने भरले आहे!
‘Music & Miracles – The Show Must Go On…’ हा कार्यक्रम संपन्न झाला… आणि आज मागे वळून पाहताना मनात एकच भावना आहे — कृतज्ञता!
एका वादकासाठी, त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने कलाकार, गायक-गायिका, वादक, तंत्रज्ञ आणि रसिक एकाच व्यासपीठावर एकत्र येणे… कदाचित अशा प्रकारचा हा एक दुर्मीळ सोहळा असेल.
केदारदादांसाठी सुरू झालेला हा प्रवास त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याच्या एका सामूहिक निर्धारात बदलला.
आणि विशेष म्हणजे — या कार्यक्रमामागे कोणताही मोठा प्रायोजक नव्हता. होता तो फक्त माणसांचा हातभार, कलाकारांचे प्रेम, मित्रांची धावपळ, असंख्य सहकाऱ्यांची मेहनत आणि रसिकांचा विश्वास. ❤️
या कार्यक्रमासाठी आपला वेळ, आपली कला आणि आपले प्रेम देणारे सर्व मान्यवर कलाकार, गायक-गायिका, वादक तसेच संपूर्ण Technical Support Team — तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता एका भावनेने आमच्यासोबत उभे राहिलात, यासाठी मनापासून नमन. 🙏
कोणताही मोठा कार्यक्रम फक्त स्टेजवर दिसणाऱ्या कलाकारांमुळे पूर्ण होत नाही. Sound, Lights, LED, Stage, Backstage, Technical Support, Catering व भोजन व्यवस्था, Photography-Videography, Designing, Printing, Social Media, Publicity, Ticketing, प्रवेश व्यवस्था आणि इतर सर्व व्यवस्थापनासाठी रात्रंदिवस धावपळ करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान तितकेच मोलाचे आहे.
ज्यांनी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला, तिकिटे विकण्याची जबाबदारी घेतली, स्वतः तिकिटे घेतली, आपल्या मित्र-परिवाराला या उपक्रमाशी जोडले, कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली आणि विशेषतः तिकीट घेऊन सभागृहात उपस्थित राहून केदारदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेले प्रत्येक रसिक — तुमच्यामुळेच हे शक्य झाले. ❤️
काही जण स्टेजवर दिसले…
काही पडद्यामागे राबत होते…
काहींनी आर्थिक हातभार लावला…
काहींनी तिकीट विकले…
काहींनी तिकीट घेतले…
काहींनी एक फोन, एक पोस्ट, एक शेअर करून मदत केली…
तर काहींनी योग्य वेळी फक्त “आम्ही आहोत तुमच्यासोबत” एवढं म्हणून बळ दिलं.
या प्रत्येक हातामुळेच ‘Music & Miracles’ उभा राहिला.
प्रत्येकाचे नाव घेणे कदाचित शक्य होणार नाही. एखादे नाव अनवधानाने राहूनही जाईल. पण या कार्यक्रमासाठी ज्याने-ज्याने अगदी छोट्यातली छोटी मदत केली, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मनात कायम कृतज्ञता राहील.
खरंच सांगायचं तर —
तुम्ही सगळे सोबत नसता, तर हे शक्यच झालं नसतं.
आणि कालच्या त्या स्टेजवर एक भावना मात्र सतत मनात होती…
केदारदादा प्रत्यक्ष आपल्यात नसले, तरी ते आपल्यासोबतच त्या स्टेजवर आहेत… प्रत्येक सुरात, प्रत्येक तालात, प्रत्येक कलाकारामध्ये आणि प्रत्येक टाळीत त्यांची उपस्थिती जाणवत होती. ❤️
क्षणोक्षणी असं वाटत होतं की, केदारदादा हे सगळं कुठेतरी आपल्यासोबत उभं राहून पाहत आहेत…
हा कार्यक्रम कोण्या एका व्यक्तीचा नव्हता.
हा आपल्या सगळ्यांचा होता… आणि केदारदादांचा होता. ❤️
कलाकारांसाठी कलाकार कसे उभे राहू शकतात, एका वादकावर संपूर्ण कलाकार परिवार आणि रसिक किती प्रेम करू शकतात, याची आठवण ‘Music & Miracles’ कायम करून देत राहील.
मनापासून… अगदी मनाच्या तळापासून प्रत्येकाचे आभार! 🙏❤️
PAFC – Pune Artist Friends Circle
Music & Miracles
The Show Must Go On… 🎶