09/05/2026
😊 या वर्षी प्रथमच सुरश्री संगीत विद्यालयाचे विद्यार्थी पुणे भारत गायन समाज आयोजित सुगम संगीत परीक्षेत सहभागी झाले. विद्यार्थ्यांकडून या पहिल्याच परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एकूण १९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, यात वय वर्ष ११ पासून ७० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. संगीत शिकण्याची आवड आणि सातत्यपूर्ण अभ्यास याला वयाची कोणतीही मर्यादा नसते, याचा प्रत्यय यावेळी आला. ✨
सुगम संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्याने रागसंगीत शिकण्याचा आणि ते सादर करण्याचा प्रयत्न केला, ही आनंदाची बाब ठरली. तसेच अमराठी विद्यार्थ्यांनी मराठी भक्तिगीते आणि अभंग शिकून सादर केले, हेही विशेष कौतुकास्पद होते.😊
परीक्षेच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांनी भजन, अभंग, भावगीते, नाट्यपदे आणि चित्रपटगीते अशा विविध गीतप्रकारांचा अभ्यास व सराव केला. 🪷
मुंबई केंद्राचे व्यवस्थापक आदरणीय श्री रवींद्र नवरे सर Ravindra Navre यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. परीक्षक राज सर यांचेही मनःपूर्वक आभार. 🙏🏻
तसेच तबल्याची साथ नितेश जाधव सर Nitesh Jadhav यांनी, तर हार्मोनियमची साथ भक्ती ब्रह्मे-घैसास Bhakti Brahme Ghaisas यांनी केली. त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता. 🙏🏻
अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आणि सरावाची सवय लागते, शिस्त निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि संगीत अधिक सखोलपणे शिकण्याची प्रेरणा मिळते. आज अशा परीक्षांची नितांत आवश्यकता आहे. पुणे भारत गायन समाज यांचा अभ्यासक्रमही अत्यंत दर्जेदार आणि उपयुक्त असून, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. 🌼
धन्यवाद🙏
Join and follow us
📺 YouTube:
https://youtube.com/?si=Jw4Fh1Z4FU-9jaUI
🔗 Google:
https://g.co/kgs/tZaRXe
📘 Facebook:
https://www.facebook.com/share/1At4CS7G6f/
📷 Instagram:
https://www.instagram.com/surashrisangeet?igsh=MTJ0YjgwcWV6cm96OA==
✨ Don't Just Listen. Like, Subscribe, Follow & Share! 🎶