23/04/2026
एक आयोजक म्हणून “विनोदी एकपात्री स्पर्धा” हा प्रवास खूप खास आणि शिकवणारा ठरला.
ही कल्पना अगदी अचानक मला आणि मिलिंद सरांना सुचली… आणि त्या एका क्षणातच आम्ही ठरवलं – काहीतरी वेगळं करायचं! पण कल्पना जितकी उत्साहवर्धक होती, तितकीच मनात थोडी भीतीही होती… मर्यादित प्रकार असल्यामुळे खरंच आपल्याला एंट्रीज मिळतील का? लोक प्रतिसाद देतील का? हे सगळं सतत मनात चालू होतं.
पण आमच्या टीमचा उत्साह मात्र अफाट होता! रसिका, मयुरेश, कुणाल, अपर्णा ताई आणि शिल्पा यांनी एकत्र टीम म्हणून अप्रतिम काम केलं — त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे नक्कीच शक्य नव्हतं. तसेच उदय सर आणि अमृता ताई यांनी परीक्षक म्हणून उपस्थित राहून स्पर्धेची पातळी निश्चितच उंचावली.
प्रत्येकाने ही स्पर्धा आपलीच समजून घेतली. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आम्ही feedback cards सारखी कल्पना आणली, ज्यामुळे प्रत्येक सहभागीला काहीतरी शिकायला मिळेल, हा आमचा प्रयत्न होता.
Certificates, mementos, banners डिझाइन करणं, त्यांना print करून वेळेत तयार ठेवणं — या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी करताना खूप मज्जा आली.
Live व्यवस्थापनाची जबाबदारी पियूष आणि पार्थ यांनी उत्तमरीत्या सांभाळली, आणि बाकीच्या टीमने coordination करून हा पूर्ण अनुभव खरोखरच “worth it” बनवला.
याशिवाय sound system arrange करणं, टेबल-खुर्च्यांची व्यवस्था, प्रत्येक छोट्या गोष्टी साठी नरेंद्र काकांनी खूप मद्दत केली.
शेवटी, ही फक्त एक स्पर्धा नव्हती… तर एक खूप अप्रतिम अनुभव होता — आमच्यासाठी, सहभागींसाठी आणि प्रेक्षकांसाठीही.�आणि एक आयोजक म्हणून, हा प्रवास कायम लक्षात राहणारा आहे.