Siddha Art

Siddha Art ऐतिहासिक महानाट्य महाभिज्ञा यशोधरा

मंगळवार ३१ मार्च रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर,दादर

*कल्याण आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवा**सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोध...
12/03/2026

*कल्याण आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवा*

*सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरेची, गोपा ते भद्रा कात्यायणा अशी प्रगल्भतेची आणि संघर्षाची भव्यदिव्य गाथा*

धम्मदान ट्रस्ट निर्मित
सिद्ध आर्ट प्रणित

*महानाट्य महाभिज्ञा यशोधरा*
लेखक/दिग्दर्शक-अरुण राधायण

*शनिवार,14 मार्च, दुपारी 4 वाजता*
*आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण*

*तिकीट विक्री थिएटर वर सुरू*

तिकीट दर 500/400/300

फोन बुकींग- संतोष जगताप- 9833625375/ सिद्धार्थ काळे 9920493513/प्रितेश मांजलकर -9619422601

*आजच आपले तिकीट बुक करा आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!*

 #प्रेक्षक_प्रतिक्रिया  #महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा दि. 8 मार्च शाहू कलामंदिर,सातारा येथे  'महाभिज्ञा यशोधरा ' हे महानाट्...
12/03/2026

#प्रेक्षक_प्रतिक्रिया
#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
दि. 8 मार्च शाहू कलामंदिर,सातारा येथे 'महाभिज्ञा यशोधरा ' हे महानाट्य उत्तम कथा,छान दिग्दर्शन आणि खुप चांगल्या अभिनयामध्ये पाहण्याचा योग आला.महाभिज्ञा यशोधरा या नाटका मधील काही प्रसंग मला खुप आवडले.

रोहिणी नदी पाणी प्रश्न : सिद्धार्थ यांनी विचारले, "पाणी महत्त्वाचे की मानवी रक्त?" त्यांनी दोन्ही बाजूंना पटवून दिले की, युद्धाने फक्त विनाश होईल आणि शेवटी पाणी तर मिळणारच नाही. त्यांनी पाणी वाटपाचे एक समान आणि न्याय्य धोरण आखून दिले. सिद्धार्थ आणि यशोधरा यांनी हे दाखवून दिले की, कोणतीही समस्या युद्धाने सुटत नाही, ती चर्चेने सुटू शकते.

जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, तेव्हा यशोधरा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण त्या खचून गेल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले आणि लहानग्या राहुलच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे पेलली.

एक स्त्री म्हणून त्यांनी आधी आपल्या पतीचा त्याग स्वीकारला आणि नंतर आपल्या एकुलत्या एका मुलाला (राहुल) स्वतःच्या हाताने धम्माच्या मार्गावर पाठवले. त्यांनी आपल्या मुलाला 'वारसा' म्हणून राजवैभव नाही, तर 'सत्य आणि ज्ञानाचा' मार्ग मागण्यास सांगितले.

यशोधरा यांचा हा प्रवास एका राजकुमारीपासून सुरू होऊन एका महान अर्हत भिक्खुणीपर्यंत पोहोचला, जो आजही करोडो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

यशोधरा या स्वतः एक राजकन्या होत्या, तरीही नंतरच्या काळात त्यांनी 'भिक्खुणी' होऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागणे स्वीकारले. एका राणीने भिक्षापात्र हातात घेणे, हा आपल्या 'मी' पणाचा (Ego) पूर्णपणे त्याग होता.

वरील सर्व प्रसंग या नाटकामध्ये पाहताना सिध्दार्थ गौतम आणि माता यशोधरा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.तीन तास खुर्चीवर कधी गेले समजलेच नाही.एक एक प्रसंग पाहताना मनामध्ये प्रेम,त्याग,करुणा,मैत्री हेच भाव उमटत होते आणि हेच विचार जगाला वाचवू शकतात कालही,आजही आणि उद्याही.'महाभिज्ञा यशोधरा ' या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रातील अनेक शहरातील नाट्यगृहांमध्ये सुरू आहेत. जीवनातील पैसा,पद,प्रतिष्ठा, संपत्ती हे सर्व संपणारे आहे‌.शाश्वत राहतात ते उत्तम चारित्र्य,उत्तम संस्कार, मानवता,मैत्री,करुणा,प्रेम,आणि त्याग.आणि हेच यशोधरा आणि सिध्दार्थ गौतम बुद्धाचे जीवनचरित्र आहे.असे अनेक उत्तम प्रसंग आपणास या नाटकात पाहायला मिळतील म्हणून आपण सर्वांनी हे नाटक पहावे आणि आपलं जीवन अधिक आनंदी करावे.

अमित चव्हाण, सातारा.

पुढील प्रयोग
शनिवार १४ मार्च दुपारी ४ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
रविवार २९ मार्च दुपारी ४ वाजता लता मंगेशकर नाट्यगृह, मीरा रोड
मंगळवार ३१ मार्च रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर,दादर

फोन बुकींग- संतोष जगताप- 9833625375/ सिद्धार्थ काळे 9920493513/प्रितेश मांजलकर -9619422601

 #प्रेक्षक_प्रतिक्रिया सातारा येथील शाहू कला मंदिर येथे “धम्मदान ट्रस्ट निर्मित सिद्ध आर्ट प्रणित महानाट्य "महाभिज्ञा यश...
09/03/2026

#प्रेक्षक_प्रतिक्रिया
सातारा येथील शाहू कला मंदिर येथे “धम्मदान ट्रस्ट निर्मित सिद्ध आर्ट प्रणित महानाट्य "महाभिज्ञा यशोधरा” हे अप्रतिम नाटक पाहण्याचा योग आला. गौतम बुद्धांविषयी आपण नेहमी ऐकतो, वाचतो; पण त्यांच्या आयुष्यातील यशोधरेची भूमिका, तिचा त्याग, तिच्या मनातील संघर्ष आणि तिची ताकद या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे उलगडताना पाहायला मिळाली.

नाटकाची मांडणी, सुंदर संवाद, प्रभावी संगीत आणि कलाकारांचा जिवंत अभिनय यामुळे संपूर्ण नाटक मनाला भिडले. विशेषतः यशोधरेच्या भूमिकेतून स्त्रीचे धैर्य, संयम आणि अंतर्मनातील वेदना अतिशय सुंदरपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

आजपर्यंत फारशी प्रकाशझोतात न आलेली यशोधरेची कथा या नाटकामुळे नव्या दृष्टीने समजली आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात अधिक आदर निर्माण झाला.

अशा दर्जेदार, विचार करायला लावणाऱ्या आणि इतिहासातील वेगळा पैलू उलगडणाऱ्या नाटकासाठी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. खरोखरच हा एक सुंदर आणि लक्षात राहणारा अनुभव होता. 👏🎭

-राहुल देवकांत, सातारा

सातारा आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवाआता सातारा नगरीत अवतरतोय भारतीय...
27/02/2026

सातारा आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवा
आता सातारा नगरीत अवतरतोय भारतीय इतिहासातील सोनेरी काळ..
सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरेची, गोपा ते भद्रा कात्यायणा अशी प्रगल्भतेची आणि संघर्षाची भव्यदिव्य गाथा
धम्मदान ट्रस्ट निर्मित
सिद्ध आर्ट प्रणित
#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
लेखक/दिग्दर्शक - अरुण राधायण
रविवार,8 मार्च सायंकाळी 7 वाजता
शाहू कला मंदिर, सातारा
तिकीट दर 500/400/300
फोन बुकींग- 9422603008/9619422601/9833625375
आजच आपले तिकीट बुक करा आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!

सांगली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवासांगली नगरीत अवतरतोय भारतीय इति...
23/02/2026

सांगली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आप्तेष्ट मित्र परिवारापर्यंत हा संदेश अवश्य पोहचवा
सांगली नगरीत अवतरतोय भारतीय इतिहासातील सोनेरी काळ..
सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरेची, गोपा ते भद्रा कात्यायणा अशी प्रगल्भतेची आणि संघर्षाची भव्यदिव्य गाथा

धम्मदान ट्रस्ट निर्मित
सिद्ध आर्ट प्रणित

#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
लेखक/दिग्दर्शक - अरुण राधायण
शनिवार,7 मार्च सायंकाळी 4.30 वाजता
विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली
तिकीट दर 500/400/300
फोन बुकींग-डॉ सुधीर कोलप 98600 69008 / धनंजय 9420791620 /प्रितेश 9619422601
आजच आपले तिकीट बुक करा आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!

 #आरंभ_सद्आरंभ_महाआरंभ... #शनिवार_7_मार्च_सांगली  #रविवार_8_मार्च_सातारा #शनिवार_14_मार्च_कल्याण  #रविवार_29_मार्च_मीरा_...
19/02/2026

#आरंभ_सद्आरंभ_महाआरंभ...

#शनिवार_7_मार्च_सांगली
#रविवार_8_मार्च_सातारा
#शनिवार_14_मार्च_कल्याण
#रविवार_29_मार्च_मीरा_रोड

धम्मदान ट्रस्ट निर्मित
सिद्ध आर्ट प्रणित
#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
लेखक/दिग्दर्शक - Arun Kadam

फोन बुकींग- संतोष जगताप- 9833625375/ सिद्धार्थ काळे 9920493513/प्रितेश मांजलकर -9619422601
आजच आपले तिकीट बुक करा आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!

तालमी जोरदार सुरू आहेत...नाटक सुंदर आकार घेतंय... लवकरच रंगभूमीवर  #महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
15/02/2026

तालमी जोरदार सुरू आहेत...
नाटक सुंदर आकार घेतंय... लवकरच रंगभूमीवर
#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddha Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share