Suniti Films

Suniti Films Suniti Films....Our Mission is to deliver Effectual & Captivating world class films. Company focused

18/10/2021
23/07/2021

*राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून खुलासा*
"५० वर्षावरील कलाकारांसाठी मासिक मानधन सुवर्णसंधी उपलब्ध" या बातमीचा खुलासा

मुंबई, दि. १२ एप्रिल
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून तसेच काही वर्तमानपत्रांतून "५० वर्षावरील कलावंतांना मासिक मानधन सुवर्णसंधी" अशी बातमी प्रसारित होत आहे. या बातमीचा खुलासा खालील प्रमाणे करण्यात येत आहे:-
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मासिक मानधन देण्याची योजना सन १९५५ पासून
राबविण्यात येत आहे.
जिल्हा निवड समितीमार्फत सदर योजना राबवली जाते. सदर योजनेसाठी पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड करण्यासाठी मा.पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे या समितीचे सदस्य सचिव असतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई हे समितीचे सदस्य सचिव असतात तर मुंबई व मुंबई उपनगर साठी समितीची निवड सांस्कृतिक कार्य मंत्री करत असतात.

या जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून कमाल १०० पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड केली जाते. पात्र कलावंतांना दरमहा श्रेणी निहाय तहहयात मानधन दिले जाते, त्यांच्या पश्चात त्यांच्या जोडीदाराला ते देण्यात येते.
ज्या कलावंताचे वय ५० वर्षे पूर्ण आहे, ज्यांचे किमान १५ ज्यांनी कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ सेवा केली आहे व ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही असे साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी ही योजना आहे.
संबंधित जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्या अखेरपर्यंत सदर योजनेसाठी अर्ज मागवण्यात येतात. तसेच अर्ज मागविण्याची मुदत आवश्यकतेनुसार शासन मान्यतेने वाढविण्यात येते.

त्यामुळे इच्छुक कलाकार याना कळवण्यात येते की, याबाबत वर्तमानपत्रातून जिल्हा निवड समितीमार्फत, रीतसर जाहिरात बातमी प्रसारित झाल्यावर, त्या त्या ठिकाणी कलाकारांनी अर्ज करावेत. असा खुलासा सांस्कृतिक कार्य संचालयामार्फत करण्यात येत आहे.

4th South Asian Short Film Festival https://filmfreeway.com/sasff2021Follow us for more updates...
02/12/2020

4th South Asian Short Film Festival
https://filmfreeway.com/sasff2021

Follow us for more updates...

South Asian Short Film Festival is the biggest Short Fiction and Documentary Film Festival in Eastern India. The festival is organized by the Federation of F...

02/04/2020

Something New and Amazing is Coming soon...
Like, Follow and Share...
If you want to be a part of upcoming projects contact

13/03/2020

Follow Suniti Films... for daily inspiration

10/03/2020

ये रे ये रे पावसा चित्रपटाचे मोशन पोस्टर

कधी हलक्या सरींनी मनावर शिडकावा करणारा, कधी वादळी वाऱ्यासंगे उग्र रूप धारण करत काळजात धडकी भरवणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी प्रत्येकाला ‘येरे येरे पावसा’ असं म्हणावंच लागतं. कधी अवचित येणारा तर कधी वाट पहायला लावणारा, कधी सारे भेद, मतभेद मिटवून अंतर्बाह्य भिजवणाऱ्या पावसाची रंजक गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पावसाचा थेंबही न बघणाऱ्या चिमुकल्यांच्या निरागस हाकेला सारे जण साद घालू, चला पुन्हा एकदा "ये रे ये रे पावसा"... गाऊ’.... या टॅगलाईनसह आलेलं हे मोशन पोस्टर पाऊस किती गरजेचा हे नकळत सांगून जातो.

चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स, चीन) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 1am
Tuesday 9am - 1am
Wednesday 9am - 1am
Thursday 9am - 1am
Friday 9am - 1am
Saturday 9am - 1am
Sunday 9am - 1am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suniti Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share