Ranzunjaar Pratisthan - रणझुंजार प्रतिष्ठान

  • Home
  • Ranzunjaar Pratisthan - रणझुंजार प्रतिष्ठान

Ranzunjaar Pratisthan - रणझुंजार प्रतिष्ठान For bookings contact +91 99676 63442

Ranzunjaar Pratisthan is a Dhol Tasha Pathak from Mumbai Maharashtra,
Ranzunjaar Pratisthan performs at various traditional miravnuk/procession and also at corporate events.

15/01/2026

आपली जबाबदारी आपला अधिकार....मतदान

#रणझुंजार_प्रतिष्ठान

आपल्या प्रतिष्ठानमधील प्रशांत पोद्दार यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐 #रणझुंजार_प्रतिष्ठान
23/06/2025

आपल्या प्रतिष्ठानमधील प्रशांत पोद्दार यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

#रणझुंजार_प्रतिष्ठान

*रणझुंजार ढोल ताशा पथक – १० वर्षांचा गौरवशाली प्रवास*रणझुंजार ढोल ताशा पथकाचा दहा वर्षांचा प्रवास म्हणजे नाद, शिस्त, परं...
21/06/2025

*रणझुंजार ढोल ताशा पथक – १० वर्षांचा गौरवशाली प्रवास*

रणझुंजार ढोल ताशा पथकाचा दहा वर्षांचा प्रवास म्हणजे नाद, शिस्त, परंपरा आणि सामूहिक उत्साह यांचं एक सुंदर मिश्रण आहे. या पथकाने आपल्या अफाट ऊर्जा, सांघिक भावना आणि सांस्कृतिक समर्पणाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रणझुंजार ढोल ताशा पथकाची स्थापना २१ जून २०१५ साली झाली. आम्हा सर्वांच्या मनात पारंपरिक ढोल-ताशा संस्कृती जपण्याची आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची इच्छा होती. सुरवातीला काही ढोल, ताशा आणि मोठ्या इच्छाशक्तीच्या जोरावर या पथकाचा पाया रचला. सुरूवातीस फक्त काही सदस्य असलेलं हे पथक हळूहळू अनेक नवयुवक-युवतींसाठी प्रेरणास्थान बनलं.

पथकाने गणेशोत्सव, शिवजयंती, गुढीपाडवा, दहीहंडी, नवरात्र उत्सव अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी सहभाग घेतला आहे. हे वादन केवळ एक सादरीकरण नसून श्रद्धा, एकाग्रता आणि जोश यांचा मिलाप आहे. पारंपरिक ठोक्यांना आधुनिक स्पर्श देऊन एक नवा प्रकार निर्माण केला, ज्यामध्ये सर्व तरुणाईचा मोठा सहभाग लाभला.

रणझुंजार पथकाची खासियत म्हणजे त्यांची शिस्त आणि एकसंध वादनशैली. प्रत्येक सदस्य सराव करून, एकमेकांशी समन्वय साधतो आणि एकत्रितपणे कार्य करतो. ढोल-ताशा हे केवळ वाद्य नाहीत, तर ते संघभावनेचं, नेतृत्वाचं आणि एकात्मतेचं प्रतीक बनले आहेत.

फक्त सांस्कृतिकच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीही या पथकाने लिलया पेलली आहे. वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण यासारख्या उपक्रमांमध्ये पथकाने सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी वादनाद्वारे समाजप्रबोधनही केलं आहे.

रणझुंजार पथकाने विविध शहरांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये विशेष आमंत्रण देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांचा वादनप्रकार आणि शिस्त पाहून अनेक नव्या पथकांनी त्यांचं अनुकरण केलं आहे.

रणझुंजार ढोल ताशा पथकाचा दहा वर्षांचा प्रवास म्हणजे परिश्रम, निष्ठा, सांस्कृतिक जपणूक आणि नवचैतन्याचा संगम आहे. पुढील काळातही हे पथक असंच जोशात, नादात आणि शिस्तीत आपली वाटचाल करत राहो हीच आई भवानी आणि आई पाटलादेवीच्या चरणी प्रार्थना!

आज पर्यंतच्या या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक ढोल ताशा रसिकास शतशः नमन !

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
#रणझुंजार_प्रतिष्ठान #दशकपूर्ती

धर्म, परंपरा व संस्कृतीच्या सेवेत रुजू व्हा !रणझुंजार प्रतिष्ठान, मालाड, मुंबई।। सभासद नोंदणी सुरु ।।-: संपर्क :-९९६७६६३...
20/06/2025

धर्म, परंपरा व संस्कृतीच्या सेवेत रुजू व्हा !

रणझुंजार प्रतिष्ठान, मालाड, मुंबई

।। सभासद नोंदणी सुरु ।।

-: संपर्क :-

९९६७६६३४४, ९६५३३२२१२१, ९८३३३६६४८५

#रणझुंजार_प्रतिष्ठान

आपल्या पथकातील उत्तम ताशावादक तुषार मेस्त्री यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरच...
04/10/2024

आपल्या पथकातील उत्तम ताशावादक तुषार मेस्त्री यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रणझुंजार प्रतिष्ठान तुषार मेस्त्री ह्याच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली...💐

🙏🙏🙏🙏🙏
#रणझुंजार_प्रतिष्ठान

सर्व रसिक मायबापांनी आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल आपले शतशः आभार...🙏🙏🙏🙏🙏 #रणझुंजार_प्रतिष्ठान
21/06/2024

सर्व रसिक मायबापांनी आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल आपले शतशः आभार...

🙏🙏🙏🙏🙏
#रणझुंजार_प्रतिष्ठान

🚩 महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🙏🙏🙏🙏 #रणझुंजार_प्रतिष्ठान
01/05/2024

🚩 महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

🙏🙏🙏🙏🙏
#रणझुंजार_प्रतिष्ठान

🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 #रणझुंजार_प्रतिष्ठान
17/04/2024

🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

#रणझुंजार_प्रतिष्ठान

Address

Malad West

400064

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranzunjaar Pratisthan - रणझुंजार प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Ranzunjaar Pratisthan - रणझुंजार प्रतिष्ठान:

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share