31/10/2024
*यवतमाळ जिल्ह्यातील किती बंजारा समाजाचे शेतकरी पॉली हाऊसमध्ये शेती करतात*
*बंजारा समाजाचे किती शेतकरी आहेत की त्यांच्या कडे उच्च दर्जाची फळबाग आहे*
*बंजारा समाजाचे किती शेतकरी आहेत ज्या दुध उत्पादन करून दुध उत्पादक संघ स्थापन केले आहे व यशस्वी व्यवसाय करतायेत.*
*बंजारा समाजाकडे कीती दुध डेअरी आहेत की जे दुध उत्पादना सोबतच दुध प्रक्रिया उद्योगातून दही, तुप, ताक, पनीर या सारखे पदार्थ उत्पादन करून यशस्वी आहेत!*
*बंजारा समाजाचे किती शेतकरी आहेत जे उच्च दर्जाची नर्सरी व्यवसाय करतात!*
*बंजारा समाजाचे कीती लोक आहेत ज्यांचे यवतमाळ वाशीम नांदेड जिल्ह्यात दाळ मील आहेत!*
*बंजारा समाजाचे सोयाबीन उत्पादक किती शेतकरी आहेत ज्यांची तेल उत्पादन व घाणासाठी तयारी तरी करतायेत!*
*बंजारा समाजाचे कीती शेतकरी आहेत जे कुक्कुटपालन शेळी पालन करू यशस्वी व्यवसाय करत आहेत*
*यवतमाळ वाशीम जिल्ह्यातील कीती बंजारा समाजाच्या शेतकरी आहेत जे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आणि त्यामार्फत आपला माल खरेदी विक्री करतात किंवा व्यवसाय करतात*
*बंजारा समाजातील कीती शेतकरी मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, कापसापासून दिव्याची वात, मेडीकल हॉस्पिटलमध्ये लागणारा कापूस तयार करतात किंवा इतर प्रक्रिया उद्योग करतात*
*बंजारा समाजाचे किती उस, केळी, पेरू, उत्पादक शेतकरी आहेत*
*मग आपण आहे कुठे ?*
*विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग मागील वीस वर्षापासून आपण काय करतोय! आणि कशी आपल्या समाजाची प्रगती होणार आहे*
*राजकारण्यांन मागे फिरू नका जर आपली प्रगती होत असेल तरच किमंत द्या नाही तर तो कुठल्याही समाजाचा असो दुरून नमस्कार करा!*
*आज वीस वर्षानंतर तुमच्या मुलांना पण तीच वेळ येईल कामासाठी मुंबई पुणे जाण्याची त्यामुळे स्वताच्या प्रगती कडे लक्ष द्या*
*सुमित चव्हाण* -