गुहागर

गुहागर व्याडेश्वर नगरी गुहागर मध्ये आपले स्वागत आहे.

16/05/2026

कोकणच्या मातीचा सुगंध, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीचा उत्साह… 🙏✨
गोंधळ म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे! ❤️

#कोकण #गोंधळ #संस्कृती #भक्ती KokanVibes

08/05/2026

आज खवय्येगिरीचा थांबा 🚩
श्रृंगारतळीतील Hotel Hemant येथे घेतला अस्सल चविष्ट जेवणाचा आस्वाद! 😋🍛
कोकणची चव, घरगुती स्वाद आणि मन जिंकणारं आतिथ्य ❤️

MarathiReels GuhagarFood खादाडगुहागर

१ मे १९५९ — कोकणच्या भूमीत जन्मलेला एक असामान्य लढवय्या…कै. मंगेश महिपत पवार यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन. 🙏एन्र...
01/05/2026

१ मे १९५९ — कोकणच्या भूमीत जन्मलेला एक असामान्य लढवय्या…
कै. मंगेश महिपत पवार यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन. 🙏

एन्रॉन/दाभोळ वीज प्रकल्पाविरोधातील आंदोलन हे केवळ एका प्रकल्पाविरुद्धच नव्हतं, तर कोकणच्या पर्यावरण, भूमी आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी उभं राहिलेलं पहिलं मोठं जनआंदोलन होतं. या ऐतिहासिक लढ्याचा अग्रभागी, ठाम आणि निडर चेहरा म्हणजे मंगेश पवार.

जागतिक स्तरावरील प्रचंड ताकद असलेल्या कंपनीविरुद्ध आवाज उठवणं हे धाडसाचं नव्हे, तर त्यागाचंही काम होतं. त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली, स्थानिकांना एकत्र केलं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली.

या लढ्यात त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं—
गुहागरमधून तडीपार होण्याची वेळ आली,
जिल्हा परिषद निवडणुकीचा विरोध व आंदोलनामुळे अनेक खटले त्यांच्या विरोधात दाखल झाले,
प्रशासन आणि सत्तेचा दबावही सहन करावा लागला…
तरीही त्यांनी कधीही आपली भूमि बदलली नाही.

त्यांचा संघर्ष केवळ विरोधाचा नव्हता, तर तो लोकशक्तीचा, स्वाभिमानाचा आणि आपल्या मातीतल्या प्रेमाचा जिवंत पुरावा होता. त्यांनी दाखवून दिलं की, एक ठाम माणूस संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या त्यागाची आठवण करून घेतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करतो.

“जिथे अन्याय होतो, तिथे आवाज उठवणं हीच खरी देशसेवा.”

कोकणच्या या महान भूमिपुत्राला विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि त्यांची प्रेरणा सदैव आपल्या सोबत राहो.
जय महाराष्ट्र 🚩🚩

29/04/2026

आता बजेटमध्ये आरामदायी मुक्काम! 🌴
गुहागर स्टे डॉर्मिटरी येथे रूम्स फक्त ₹499/- पासून सुरू.
स्वच्छ सुविधा, आधुनिक सोयी आणि समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ — पर्यटकांसाठी उत्तम पर्याय!
आजच तुमचा मुक्काम बुक करा. ✨

21/04/2026

गुहागरमध्ये एकमेव आणि सर्वाधिक बेडिंग कॅपॅसिटी असलेले डॉर्मिटरी 🛏️✨
Guhagar Stay – तुमच्यासाठी आरामदायी आणि बजेट फ्रेंडली पर्याय!

🌊 गुहागर बीचपासून फक्त 7 मिनिटांच्या अंतरावर
🎯 Indoor & Outdoor Games ची मजा
📶 Free WiFi सुविधा
🚿 स्वच्छ आणि हायजेनिक वॉशरूम्स

हे सगळं फक्त ₹499/- पासून! 💥

आता तुमचा next stay plan करा Guhagar Stay सोबत 🌴🔥

19/04/2026

गुहागरच्या कासव महोत्सवाचा अप्रतिम अनुभव 🐢✨

प्रसिद्ध यूट्यूबर Jeevan Kadam आपल्या “Jeevan Kadam Vlogs” मधून सांगत आहेत हा अविस्मरणीय प्रवास! 🌊
निसर्गाच्या सान्निध्यात, छोट्या कासवांच्या जन्माचा सुंदर क्षण अनुभवताना मिळणारी शांतता आणि आनंद खरंच शब्दात मावणार नाही 💙

तुम्हीही असा वेगळा आणि खास अनुभव घ्यायचा असेल, तर गुहागरचा कासव महोत्सव चुकवू नका! 🌴🐢

Address

व्याडेश्वर नागरी
Guhagar
415703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गुहागर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share