Vachaspati Production वाचस्पती निर्मिती

  • Home
  • Vachaspati Production वाचस्पती निर्मिती

Vachaspati Production वाचस्पती निर्मिती Vachaspati Productions is a Music Production owned by Tejas More. The main purpose of this instituti

09/09/2025
सुगंधित वसंताची उत्तररात्र हवी असेल तर, सुरभीगंधाच्या फुलांचा बहर आसमंतात बहरतो तो क्षण हवा...! हा बहर असतो बागेश्री सार...
06/02/2025

सुगंधित वसंताची उत्तररात्र हवी असेल तर, सुरभीगंधाच्या फुलांचा बहर आसमंतात बहरतो तो क्षण हवा...! हा बहर असतो बागेश्री सारखा...! तो पानोपानी असतो– पण एका जागी थांबत नाही. त्याचा आस्वाद घ्यावा न घ्यावा तोच वाऱ्याची झुळूक पुढे सरलेली असते. पण हा सुगंध या वाऱ्याची झुळूक येण्याची वाट पाहत नाही, तर या सुगंधाचा पान्हा संबंध हवेला केव्हाच फुटलेला असतो. बागेश्रीचे स्वरदेखील असेच त्या रात्रीला फुटलेला पान्हा आहे. ते पाझरतात, ते पंचमाची वाट पाहत नाहीत, ते पसरत राहतात आणि रात्र सुगंधित करतात.

अहा सुगंधित सुरभिगंधा
मंद हवेला फुटला पान्हा
जरी दाटले मळभ नभाला
उठला सूर्य, उठला कान्हा...

मयुरध्वनीचा षड्ज घुमतो
पानोपानी ताल वाजतो
रागिणीची मैफिल आता
निसर्गराजा नकळत विणतो...

 #समर्पण
10/01/2025

#समर्पण

शिशिर ऋतूची सुरूवात होतेय...शीतल वारा शल्य जणू ते झोंबून जाई अंगालाशिशिर ऋतू पिवळा परंतु थंडी गुलाबी रंगालापहाट होते, ओल...
19/12/2024

शिशिर ऋतूची सुरूवात होतेय...

शीतल वारा शल्य जणू ते झोंबून जाई अंगाला
शिशिर ऋतू पिवळा परंतु थंडी गुलाबी रंगाला

पहाट होते, ओला सडा दवबिंदूंचा होत असे
लाजत बुजरा गारठलेला सूर्य लज्जालाल दिसे

दाट पसरले धुके चहुकडे रम्यतेला नसे वाली
पहाट सरता गारठलेली पाखरांच्या उडती शाली

नववधू जणू सजली टेकडी बहरता नाना फुले
झडली पाने दुबाजूला जणू बकाल वस्तीतील मुले

खळखळ वाहता झरा यौवन संपून हो प्रौढ जरा
धवल स्वच्छ जरी शील तया मंद हासरा तो बुजरा

तीळ तीळ वाढे सूर्य उष्णता मकर राशीत अखेर
कणाकणातून सृष्टी सांगे पुनरुज्जीवन दे शिशिर

-तेजस ©
१९-१२-२०२४

Address

Hedavi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vachaspati Production वाचस्पती निर्मिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share