16/01/2025
*हे काप्या....*
पुर्वी प्रत्येक सन म्हणजे मनोरंजनाची मेजवानीच असायची.मोबाईल टीव्ही नसल्याने प्रत्येक सनाची वाट पाहीली जायची.
संक्रांत या सनाची हवा दोन महीने आधीपासून सुरू व्हायची.
आकाशात पंतग डोलू लागायचे.पंतग उडवने ही पण एक कला असते.ती सर्वांनाच जमते असे नाही.मी त्यात जरा 'ढ' होतो.चक्रीधरायच हे काम म्हणजे "तू लढ मी कपडे संभाळतो"या ठेवनीतल होत.ते मी आवडीने करायचो.चुक नसताना कधी कधी चक्री धरनार्यावर राग काढला जायचा.
म्हणजे "नाचता येईनाअंगण वाकडे"
पंतग कोणी कापला कि "चंक्री नीट धर न राव "
माझी चुक मला आजही नाही कळली. उपकार म्हणून कधी आमच्या हाती ऊंच
डुगलेला पंतग दिला जायचा.आकाश ठेंगण् वाटायच.
नशिबाने तो. कायम शांत उडणारा पंतगही आमच्याच हाती आलयावर एखाद्या झाडात आत्महत्या करायचा,गच्ची सोडून (मार खायच्या आत)धूम पळाव लागायच ! चक्री धरायचा "बीन पगारी जाॅब" काही दिवस सुटायचा ! बँड मधले खुळकुला वाजवणारे अन चक्री धरणारे या दोघात मला तरी फरक वाटत नाही.
मांजा सुतावने हे तर काही तज्ञांनाच जमायच !शिरस उकळने ,सोडा वाॅॅटरच्याच बाटलीची काच खलबत्त्यात कुटणे, ती बारीक पिठा सारखी चाळणे,असे अनेक कंगोरे असायचे. हे क्रियाकर्म करताना तज्ञाचें अनेकदा मतभेद व्हायचे.अखेर सर्व वरात नदीच्या कडेला यायची . मांजा सुतावने हे जूकरीचे काम चार चार तास चालायचे.साखळी,दसनंबरी इ.दोर्याचे रिळ असायचे.भांड्यात धरलेल्या दाभीनीतून दोरा चकरीवाला लांब घेऊन जायचा,दोन जन कापडात काच धरायचे . काच धरनारेही स्वताला तज्ञ समजायचे.मांजाने चराचरात बोटे कापल्या गेली तरच मांजा "लई भारी "समजला जायचा.सुतवनार्या तज्ञ लोक या फिल्ड मधले" क्लासवन ऑफिसर "सारखे वागायचे.आमच्या सारख्या शिकाऊं ऊमेदवारांना चूकताच एखादा (उगाच) फटका ही बसायचा !
महिनाभर हे पतंगाच युध्द साहित्य गच्चीवर असायच.डोळे दुखे पर्यंत आकाशात पहात बसायचो.एखादा "कटला "कि चारी बाजूने धावाधाव व्हायची. खाली माती पडते म्हणून आयाबायाच्या तोंडून "शिंव्या चें भुईनाळे "उडायचे.न ऐकता" मतलबी भैरा "होऊन पंतगा मागे धावत रहायचो.अनेक गच्ची पार करून कधी कधी शेजारच्या गल्लीत ही पोहचायचो कळायचे नाही.अनेक वेळा पंतग पकडला तरी इतर त्याच्या चिंध्या करायचे.'मला नाही तर तुला नाही.' कटलेले पंतग पकडणारे काही एक्स्पर्ट असायचे.त्याच्याकडे अनेक पकडलेले पतंग असायचे.
या दिवसात चांगला अन् वाईट 'शब्द संग्रह 'खुप वाढायचा. पण अभ्यासाची बोंब व्हायची. पतंगाला रंभ्याण,टुक्कल,शेपटी,भिंगरी,चौकट ,बदाम,अशी अनेक नावे आठवतात."हे काप्या, दे ढील,घे आखडून,लई कणतो राव,गोत घेतो का?,ठेवल्या ठेवल्या सटाक, काय तान आहे राव,"असे हजारो डाॅयलाग झोपेतही बरळायचो. ती वाक्ये आजही ऐकू येतात.
संक्रांतीला तर जेवन ही टेरेसवरच व्हायचे. महिला वर्ग ही नवरयाची काटाकाटी कौतुका ने बघायला असायचा.या गोंधळात काही प्रेम प्रकरणे फुलायची. बोटे कापली तरी चिंध्या बांधून उडवने चालूच असायचे.स्वताची चक्री भरली तरी दुसऱ्याचा मांजा लुटण्याची मजा' कुछऔर असायची.त्या मुळे भांडणंही व्हायची. अखेर दमलेले सारे विर अंधार पडल्यावर घरोघरी तिळगूळ गोळा करीत फिरायचे!
नवले शेखर
गुलमोहर रोड, अहिल्यानगर
9420637220