aaveg production

aaveg production aaveg production house is a film and short film production company owned by Bhushan Ganurkar.

आवेग प्रोडक्शन निर्मित आणि Bhushan Ganurkar यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘सिंधू’ या लघुपटाचे पोस्टर तुमच्यासोबत शेअर करताना ...
03/05/2026

आवेग प्रोडक्शन निर्मित आणि Bhushan Ganurkar यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘सिंधू’ या लघुपटाचे पोस्टर तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.

कालचा दिवस माझ्यासाठी अत्यंत खास ठरला.मी सध्या सहाय्यक अध्यापक म्हणून दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल, MIT-WPU, को...
03/05/2026

कालचा दिवस माझ्यासाठी अत्यंत खास ठरला.

मी सध्या सहाय्यक अध्यापक म्हणून दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल, MIT-WPU, कोथरूड येथे कार्यरत आहे. काल आमच्या विभागात अत्याधुनिक फिल्म स्टुडिओचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या निमित्ताने ‘घाशीराम कोतवाल’ (हिंदी) या नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले असून, त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

या भव्य सोहळ्यात, संजय मिश्रा आणि अभिजीत पानसे यांच्या हस्ते मी दिग्दर्शन केलेल्या ‘सिंधू’ या मराठी लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा क्षण माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण टीमसाठी अविस्मरणीय ठरला.

या दोन्ही मान्यवरांनी आमच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे.

अशा मोठ्या मंचावर आमच्या लघुपटाचे पोस्टर लाँच करण्याची संधी मिळणे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

या लघुपटाच्या निर्मितीत अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्याबद्दल लवकरच सविस्तर लिहीन.

धन्यवाद 🙏

25/04/2026

 #संहितापूजन
25/04/2026

#संहितापूजन

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when aaveg production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category